आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajsathan Court Snatch The Opportunity And Demand Of Woman

दुस-या मुलीला दत्तक घेण्यापासून 'तिला' कोर्टाने रोखले, सुष्मितालाही झाला होता त्रास!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपुर- ती पहिल्यांदा एका मुलीची आई बनली. ती मुलगी हळू हळू मोठी होत चौथीत गेली. शाळेत शिकत असताना ती आपल्या स्कूलमेंटकडून त्यांच्या भावाबहिणींच्या रंजक किस्से ऐकायची. मग घरी आल्यावर तिने तडक आईला प्रश्न केला, मला एकही भाऊ-बहिण का नाही, कधी येणार आहे?. हा सवाल आईच्या मनाला लागला. आपली मुलगी एकटीपणा अनुभवत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आणखी खंबीर होत आणखी एक मुलीचे आई होण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिला कोर्टाने रोखले. कारण काय तर तुम्हाला आधीच एक मुलगी आहे आणखी एक कशाला घेता. कायदा याची परवानगी देत नाही असे तिला प्रशासनाकडून सांगितले गेले. ही कहानी आहे राजस्थानमधील उद्यपूर येथील अकाऊंट अधिकारी असलेल्या ममताची (नाव बदलले आहे).
ममताने लग्न केले नाही. तरीही ती मुलीची आई आहे. दोघींनाही तिने अनाथाश्रमातून दत्तक घेतले आहे. पहिलील 2005 मध्ये दत्तक घेतले तर दुसरीला आठ महिन्यापूर्वी. पहिल्या मुलीची आई होताना तिला काही अडचण आली नाही. दुसरीलाही तिने मनापासून स्वीकारत भावनिक नाते निर्माण झाले. त्यामुळे आई व मोठी मुलगी आनंदी होत्या. मात्र, या दोघींकडे कायद्याने पेच निर्माण केला आहे.
सुष्मिता सेन हिलाही दोन मुली दत्तक घेण्याची परवानगी घ्यावी लागली होती- माजी मिस यूनिवर्स सुष्मिता सेन हिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. हिंदू दत्तक कायद्यामुळे तिलाही अडचण निर्माण झाली होती. मात्र, तिने वरच्या कोर्टाची परवानगी मिळवत दुसरी मुलगी दत्तक घेतली होती.
पुढे वाचा, काय झाले त्या मुलीसोबत...