आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्तीवरून नितीन गडकरी गाेत्यात, राज्यसभेत विराेधकांचा गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गडकरी कुटुंबाशी संबंधित पूर्ती उद्योगसमूहाला कर्जे देताना अनियमितता झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले. याच मुद्द्यावरून काँग्रेस खासदारांनी सोमवारी राज्यसभेत गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, आपल्या विरोधात भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नसल्याचे सांगत गडकरींनी राजीनाम्यास नकार दिला.

सरकारी मालकीच्या भारतीय अपारंपरिक ऊर्जा विकास संस्थेने (इर्डा)नागपूरमध्ये २२ मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कारखान्याला ४६.६३ कोटींचे कर्ज दिले होते. त्याचे व्याजही चुकते केल्याचे स्पष्टीकरण गडकरींनी दिले.

पूर्तीची बनवाबनवी
पूर्ती साखर कारखान्याला इर्डाने ७५ टक्के वीजनिर्मिती अपारंपरिक स्रोतांमार्फत व २५ टक्के वीज अन्य स्रोतांमार्फत करण्याच्या अटीवरच कर्ज दिले होते. मात्र, पूर्तीने १०० टक्के वीजनिर्मिती कोळशावर केली. असा बदल कसा काय केला? प्रारंभापासूनच पूर्तीने घोळ घातला. नंतर हा प्रकल्प एनपीए जाहीर करण्यात आला. एनपीए घोषित केल्यानंतर कसे काय कर्ज घेऊ शकता?, असा आक्षेप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी घेतला.