आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajya Sabha Adjourned After Uproar Over Conversion Issue

धर्मांतर मुद्दा : राज्यसभेत गदारोळ, विरोधक पंतप्रधानांच्या निवेदनावर अडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - धर्मांतराच्या मुद्यावरुन संसदेत आजही (गुरुवार) गदारोळ झाला. राज्यसभेचे कामकाज आजही गदारोळात सुरु झाले. धर्मांतराच्या मुद्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सभागृहात उपस्थित होते. विरोधीपक्षाने धर्मांतराच्यामुद्यावर मोदींनी निवेदन करावे, अशी मागणी लावून धरली. त्यावर सत्ताधारी पक्षाने चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत या मुद्यावर गृहमंत्री बोलतील ही भूमिका घेतली आहे. यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी दोन पर्यंत स्थगित करण्यात आले होते.
राज्यसभेच्या कामकाजाला दुपारी पुन्हा एकदा गोंधळात सुरुवात झाली. त्याआधी राज्यसभा सभापती हमिद अन्सारी यांनी चर्चेसाठी अट ठेवली जाऊ शकत नाही असे स्पष्ट केले.
बळजबरीने होत असलेल्या धर्मांतराच्यामुद्यावर पंतप्रधानांनी सभागृहात निवदेन करावे या मागणीसाठी चार दिवसांपासून विरोधक अडून बसले आहेत. विरोधकांनी सरकारवर अहंकारी आणि हटवादी असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सभागृहाचे कामकाजात अडथळे आणले. दुसरीकडे, सरकारने दावा केला, की कामकाज होऊ न देण्यासाठी सरकारचा हटवाद कारणीभूत नसून विरोधकांचे संख्याबळ (राज्यसभेत विरोधकांचे संख्याबळ जास्त आहे) जबाबदार आहे.
पंतप्रधान सभागृहात बोलत नाही आणि विरोधक मागणीवर अडून बसले या परिस्थितीमुळे शुन्यप्रहरात दोन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.
काय झाले सभागृहात
सभागृहात काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले, 'राज्यसभेच्या कामकाजात जे अडथळे येत आहे, त्याला सरकराचा हटवाद जबाबदार आहे. सरकार अहंकार दाखवत आहे. जर पंतप्रधान सभागृहात उपस्थित राहाता आणि धर्मांतराच्या मुद्यावरील चर्चा ऐकतात तर सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडू शकते.'

लोकसभेत बहुमताची हुकुमशाही - येचूरी
अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, 'या मुद्यावर सभापतींनी प्रस्ताव ठेवला आहे. मात्र विरोधकच मुद्दा उपस्थित करतात आणि विरोधकच सभागृहाचे कामकाज चालू देत नाहीत. उलट सरकारच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली जात आहे.' ते म्हणाले, की सरकारची इच्छा सभागृहात कामकाज व्यवस्थित सुरु राहावे ही आहे. ते म्हणाले, लोकसभेत व्यवस्थित कामकाज होत असताना वरिष्ठ सभागृहातच गोंधळ का होत आहे.
ते म्हणाले, हा सरकारचा अहंकार नाही, तर संख्याबळाचा अहंकार आहे. यावर सिताराम येचूरी म्हणाले, 'लोकसभेत बुहमताची हुकुमशाही आहे.'

सईदची जुळी भावंडे भारतात धर्मांतर घडवून आणतात - काँग्रेस
याआधी काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांनी धर्मांतराचा मुद्या उपस्थित केला. ते म्हणाले, पाकिस्तानचा कुख्यात हाफिज सईद भारताचा बदला घेण्याची भाषा करत आहे. भारतातही हाफिज सईदचे अनेक जुळी भावंडे आहेत, जे बळजबरीने धर्मांतर करत आहेत आणि त्याला समर्थन देत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा कडाडून विरोध केला. दुरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, आपल्या देशातील कोणत्याही व्यक्तीची सईदसोबत तुलना करणे योग्य नाही. हे बे-जबाबदार वक्तव्य आहे.
यानंतर काँग्रेसचे आनंद शर्मा म्हणाले, आमच्या पक्षाचे हनुमंत राव यांना सभापती हामिद अन्सारी यांनी नियम 255 नुसार निलंबित केले आणि सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यांच्याबद्दल संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यावर कुरियन म्हणालेय सभापतींच्या कामकाजाला आव्हान दिले जाऊ शकत नाही आणि त्यावर चर्चा देखील केली जाऊ शकत नाही.

पंतप्रधानांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करु नये - यादव
तृणमूल काँग्रेस सदस्य सुखेन्दू शेखर राय म्हणाले, पंतप्रधानांनी सभागृहात निवेदन केले पाहिजे. त्यानंतरच सभागृहाचे कामकाज शांततेत सुरु होईल. जनता दल संयुक्तचे नेते शरद यादव म्हणाले, पंतप्रधान या मुद्याला प्रतिष्ठेचा का करत आहेत. त्यांनी सभागृहात येऊन या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले पाहिजे.