आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajya Sabha Election: SC Dismissed Congress Plea, Gujarat Poll To Have NOTA Option

गुजरात राज्यसभा निवडणुकीत \'नोटा\' लागू; काँग्रेस म्हणते भ्रष्टाचार वाढेल, कोर्ट म्हणाले 2014 पासून गप्प का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुजरातमध्ये येत्या ८ ऑगस्टच्या राज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ (कोणत्याही उमेदवाराला मत न देण्याचा पर्याय) वापरण्यास बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत काँग्रेसलाही फटकारले. या निवडणुकीत नोटाचा वापर झाल्यास भ्रष्टाचाराला चालना मिळेल, असा काँग्रेसचा दावा आहे.
 
त्यावर  ‘नोटाची अधिसूचना जानेवारी २०१४ मध्ये आली होती. त्यानंतर अनेक निवडणुका पार पडल्या. आतापर्यंत तुम्ही गप्प का होते? आता परिस्थिती विपरीत असल्याचे पाहून त्यास आव्हान द्यायला आले’, अशा शब्दांत न्या. मिश्रा यांनी काँग्रेसला सुनावले. तथापि, राज्यसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने १ ऑगस्टला जारी अधिसूचनेच्या पडताळणीचा निर्णय पीठाने घेतला. यासाठी न्यायालयाने आयोगाकडून दोन आठवड्यांत उत्तर मागवले. पुढील सुनावणी १३ सप्टेंबरला होणार आहे.  
 
सुप्रीम काेर्ट लाइव्ह...
 
२०१४ नंतर ९५ जागांवर २५ राज्यसभा निवडणुकीत नोटा नियम लागू होता : निवडणूक आयोग
 
न्या. दीपक मिश्रा, अमिताव रॉय, ए. एम. खानविलकर यांनी गुजरात काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी केली. काँग्रेसकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी व हरिन रावल यांनी बाजू मांडली. कोर्टातील घटनाक्रम असा....
 
कपिल सिब्बल : गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. नोटाच्या वापरामुळे भ्रष्टाचार वाढेल.  
 
न्या. दीपक मिश्रा : यामुळे भ्रष्टाचार वाढेल, असे वाटत नाही. २०१४ मध्ये नोटा अधिसूचनेनंतर किती निवडणुका झाल्या हीमाहिती निवडणूक आयोगाने द्यावी.
 
अशोक देसाई (आयोगाचे वकील): कोर्टाच्या आदेशाने २०१४ मध्ये नोटा लागू झाला. 
त्यानंतर राज्यसभेच्या ९५ जागांसाठी २५ वेळा निवडणूक पार पडली आणि त्यात हा नियम होता. 
 
 न्या. मिश्रा (काँग्रेसला) : तुम्ही राजकीय पक्ष आहात. एखादा आमदारही यास आव्हान देऊ शकला असता. पण, तुमच्यावर परिणाम होईपर्यंत प्रतीक्षा करू शकत नाही. २०१४ मध्ये नोटा देशभर लागू झाला होता हे लक्षात ठेवा.  
 
 देसाई : कोर्टाच्या आदेशावरून नोट लागू झाला. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, त्यातही नोटा होता.  
(कोर्टाने महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांना केंद्राचे मत विचारले. पण, वेणुगोपाल यांनी हस्तक्षेपास नकार दिला. त्यावर कोर्टाने त्यांच्याकडून राज्यसभा निवडणुकीत नोटाच्या वापराशी संबंधित घटनात्मक पैलूंवर सल्ला मागितला.)  
 
अभिषेक मनू सिंघवी : हा मुद्दा सर्व पक्षांवर प्रभाव टाकू शकतो. नोटा भ्रष्टाचारास खतपाणी घालू शकते. घटनेत यासंदर्भात तरतूद नाही, ही निवडणूक आयोगाची अधिसूचना आहे. हे लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे उल्लंघन आहे.  
 
 न्या. मिश्रा : राज्यसभा निवडणुकीत नोटाचा वापर घटनात्मक आहे की नाही? यावरच आम्ही सुनावणी करू.
 
यामुळे काँग्रेसचा विराेध : गुजरातध्ये राज्यसभेच्या ३ जागांसाठी भाजपने अमित शाह, स्मृती इराणी व काँग्रेसमधून आलेले बलवंत सिंह राजपूत यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे अहमद पटेल यांचा पराभव टाळण्यासाठी काँग्रेस नोटाचा विरोध करत आहे. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...