आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rajya Sabha Passes Bill To Declare Assam River As National Waterway

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाम नदीला राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा बहाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आसाममधील बराक नदीच्या 121 कि.मी. लांब नदी प्रवाहाला राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा देणारे विधेयक राज्यसभेत बुधवारी मंजूर करण्यात आले. ईशान्य राज्यामध्ये जलवाहतूक सोईस्कर करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

राष्ट्रीय जलमार्ग (लखीपूर- भांगा नदी प्रवाह) विधेयकाच्या मंजुरीतून हा देशातील सहावा जलमार्ग झाला आहे. यामुळे आसाम, नागालॅँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशला जलमार्गाद्वारे माल वाहतूक करणे सोईचे जाणार आहे. जहाज वाहतूक मंत्री जी. के. वासन यांनी विधेयक मांडले. या प्रकल्पासाठी 123 कोटी रुपये खर्च येणार असून दोन टप्प्यात पाच वर्षांमध्ये तो पूर्ण होणार आहे. या मार्गावरून चहा, कॉफी, पोलाद, कच्चे लोखंड आणि कोळशाची वार्षिक 12.45 लाख टन वाहतूक करण्याची क्षमता असेल. 2018-19 मध्ये वाहतुकीला सुरुवात होईल. जलमार्गाचा लाखो लोकांना उपयोग होईल, अशी आशा वासन यांनी व्यक्त केली. पहिला टप्पा 2016-17 मध्ये सुरू होईल.