नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य डी. बंदोपाध्याय यांनी एलटीसी घोटाळ्याचा तपास करणार्या सीबीआयला हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे. खोटे दस्तऐवज तयार करून प्रवास भत्ता हडपल्याच्या घोटाळ्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यसभा सभापती कार्यालयाकडून तपास संस्थेला नोटीस मिळाली आहे. बंदोपाध्याय यांचे घर आणि कार्यालयाची झडती घेणे खासदारांच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन आहे, असे त्यात म्हटले आहे. आवश्यक परवानगीनंतर झडती घेण्यात आली होती, असे सीबीआयचे म्हणणे आहे. आता सीबीआय या नोटिसीला रितसर उत्तर देईल. या प्रवास भत्ता घोटाळ्यात राज्यसभेचे तीन विद्यमान आणि तीन माजी खासदार आहेत.