आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावर विरोधक अडून, सोनिया-राहुल देणार धरणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संसदेत जाण्याआधी पत्रकारांशी वार्तालाप करताना पंतप्रधान मोदी - Divya Marathi
संसदेत जाण्याआधी पत्रकारांशी वार्तालाप करताना पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आपेक्षेप्रमाणे गोंधळातच सुरुवात झाली आहे. राज्यसभेत विरोधकांनी नियमीत कामकाज बाजूला ठेवत आयपीएल भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या ललित मोदींवरुन रान उठवले. त्यामुळे दुपारी 12 पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले तर, लोकसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि उद्यापर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. दुसरीकडे, काँग्रेसने त्यांची उद्याची रणनीती स्पष्ट केली आहे. बुधवारी काँग्रेस संसद परिसरात धरणे आंदोलन करणार आहे. याचे नेतृत्व सोनिया आणि राहुल गांधी करणार आहेत.
मोदींनी भूसंपादनावरील प्रश्न टाळला
संसदेत जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'काल सर्वपक्षीय बैठक चांगल्या वातवरणात पार पडली. मागील अधिवेशनादरम्यान काही पक्षांनी आश्वासन दिले होते, की पुढील अधिवेशनात काही कामे प्राथमिकतेने पूर्ण केले जातील. मला विश्वास आहे, की सर्वमिळून काही चांगले निर्णय घेऊ.' दरम्यान काही माध्यमकर्मींनी जेव्हा भूसंपादन विधेयकासंबंधी प्रश्न विचारला त्याकडे मोदींनी कानाडोळा केला आणि ते निघून गेले.
सुषमा स्वराज यांनी घेतली सोनिया, मुलायमसिंहाची भेट
सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि समजावादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली. पंतप्रधानांनीही सोनिया आणि यादव यांच्यासोबत चर्चा केली. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी त्यांचा पक्ष भूसंपादन विधेयकाला विरोध करेल असे स्पष्ट केले.
राजीनामा द्या, काकमकाज चालू देऊ
भाजप नेत्यांशी संबंधीत ललितगेट आणि मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्यावरुन संसदेत बुधवारीही गदारोळ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने सभागृहातील कामकाज सुरळीत चालू देण्यासाठी सरकारसमोर एक पर्याय ठेवला आहे. सुषमा स्वराज, वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे राजीनामे घ्या, त्यानंतरच कामकाज चालू देऊ. सरकारच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले की आम्ही कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेणार नाही.
दरम्यान, काँग्रेसचे सदस्य आनंद शर्मा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उभे राहिले मात्र, विरोधकांनी पंतप्रधानांनी त्यावर उत्तर देण्याची मागणी लावून धरली. सदस्य घोषणाबाजी करत राज्यसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत पोहोचले. अध्यक्ष पी.जी. कुरियन यांनी जेटलींचे उत्तर ऐकून घेण्याची केलेली विनंती विरोधकांच्या गोंधळात कोणापर्यंतच पोहोचली नाही. जेटलींनी विरोधकांची मागणी मान्य करत चर्चेची तयारी दाखविली परंतू पंतप्रधानांच्या निवेदनावर अडून बसलेले विरोधक शांत झाले नाही. त्यामुळे सभागृह 12 पर्यंत स्थगित करण्यात आले. दुसरीकडे लोकसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून बुधवारपर्यंत कामगाज तहकूब करण्यात आले.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर झालेल्या आरोपांना त्या स्वतः उत्तर देतील असेही जेटलींनी सांगितले. मात्र विरोधक शांत झाले नाही.
बातम्या आणखी आहेत...