आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakhi Bidlan May Out And Manish Sisodia, Saurabh In Arvind Kejriwals Cabinet News In Maratjhi

असे असेल केजरीवालांचे मंत्रिमंडळ, जुन्यांना डच्चू तर नव्यांना मिळणार संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप' हा सगळ्यांचा 'बाप' ठरला आहे. कॉंग्रेसचा सुपडा साफ करून 'आप'ने भाजपचा विजयरथ रोखला आहे. 'आप'ने आता दिल्लीत सरकार स्थापन करण्‍याची तयारी सुरु केली आहे. केजरीवाल यांच्या सरकारमधून काही जुन्या नेत्यांची 'सुट्टी' होणार आहे. तसेच त्यांच्या जागेवर नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यावेळी आपल्या मंत्रिमंडळात अनुभवी नेत्यांनाच सहभागी करून घेण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे केजरीवालांच्या कॅबिनेटमध्ये 'आप'चे आमदार मनीष सिसौदिया, जरनैल सिंह, गोपाल राय, सौरभ भारद्वाज आणि आदर्श शास्त्री यांना महत्त्वाची मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचा पराभव करणारे एस.के. बग्गा यांना देखील संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमनाथ भारती यांना विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, राखी बिडलान यांचा 'पत्ता' यावेळी कापला जाणार....