आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakhi Birla Brother Beat His Wife Complaint In Police Station Of Delhi

AAP नेत्याचे अनेक महिलांसोबत संबंध, पत्नीने केला स्टिंग केल्याचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदम पार्टीच्या (आप) नेत्या आणि आमदार राखी बिर्ला यांच्या भावावर पत्नीला मारहाण आणि कौटूंबिक हिंसेचा आरोप ठेवण्यात आला आहे. राखी बिर्ला यांच्या वहिणी प्रियंका यांनी त्यांचे पती विक्रम बिर्लावर मारहाणीचा आरोप केला आहे. याबाबतची लेखी तक्रार त्यांनी रोहिणी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. प्रियंकाचा आरोप आहे, की त्यांच्या पतीचे अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध आहेत. त्याच्या अनैतिक संबंधांना विरोध केला तर तो मारहाण करतो. विक्रम बिर्ला बहिण राखी सोबत पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्या भागात त्याचा आप नेता म्हणून दबदबा आहे.
विक्रमचे स्टिंग केले, प्रियंकाचा दावा; केजरीवालांकडे करणार तक्रार
काही दिवसांपूर्वीच राखी बिर्ला यांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी आमदार राखी बिर्ला यांना महागडी एसयूव्ही कार भेट देण्यात आल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. आता त्यांची वहिणी प्रियंकाने केलेल्या आरोपामुळे राखी बिर्ला पुन्हा गोत्यात आल्या.
प्रियंका बिर्ला यांनी दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे, की विक्रमचे अनेक स्त्रियांसोबत अनैतिक संबंध आहेत. त्या महिलांची नावे देखील मला माहित आहे. प्रियंका यांनी दावा केला आहे, की त्यांच्याकडे विक्रमच्या अनैतिक संबंधाची क्लिप देखील आहे. त्यावरुन सिद्ध करता येईल की त्याचे किती महिलांच्या संपर्कात आहे.
पोलिसात तक्रार दाखल करताना आमदार राखी बिर्लाच्या वहिणीने तिला झालेल्या मारहाणीच्या खूणा पोलिसांना दाखवल्या. प्रियंका म्हणाल्या, विक्रम मला बेल्टने मारहाण करत होता. रोहिणी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी प्रियंकाची वैद्यकीय तपासणी केली आहे. प्रियंका म्हणाली, 'विक्रम अनेक वर्षांपासून माझा छळ करत आहे. पण जेव्हापासून त्याची बहिण आमदार झाली, तेव्हापासून त्याला कोणाचीही भीती वाटत नाही. तेव्हापासून तो मला अधिक टॉर्चर करत आहे. या प्रकरणात जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर मी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांकडे तक्रार करेल.'
फोटो - पतीच्या मारहाणीच्या खूणा दाखवताना पीडित प्रियंका
पुढील स्लाइडमध्ये पाहा कोणा आहे प्रियंका आणि तिचा पती विक्रम