आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raksha Bandhan: Widows, Children Tie Rakhi On The Hands Of President Kovind, PM Modi

103 वर्षीय शरबती देवी यांनी मोदींना बांधली राखी, 50 वर्षांपूर्वी झाले होते भावाचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आशिर्वाद देताना शरबती देवी - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आशिर्वाद देताना शरबती देवी
नवी दिल्ली- रक्षाबंधननिमित्त चिमुरड्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. दुसरीकडे, वृंदावनमध्ये राहाणार्‍या विधवा महिलांनीही पंतप्रधान कार्यलयात (पीएमओ) जाऊन मोदींना राखी बांधली.

विशेष म्हणजे मोदींना राखी बांधण्यासाठी 103 वर्षीय शरबती देवी पीएमओमध्ये आल्या होत्या. शरबती देवी यांच्या बंधूचे 50 वर्षांपूर्वी निधन झाले होते. शरबती देवी यांनी मोदींना राखी बांधण्याची इच्छा त्यांच्या मुलाकडे व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या मुलाने मोदींना पत्र लि‍हून आईच्या इच्छेबाबत सांगितले होते. 'सर, तुम्हाला राखी बांधण्याची माझ्या आईची इच्छा आहे.', असे शरबती देवी यांच्या मुलाने पत्रात लिहिले होते.

सुलभ इंटरनॅशनलकडून कार्यक्रमाचे आयोजन...
- न्यूज एजन्सीनुसार, विधवांच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुलभ इंटरनॅशनलने आयोजित केला होता. 2012 पासून सुलभ इंटरनॅशनल वृंदावन, वाराणसी आणि उत्तराखंडच्या जवळपास एक हजार विधवांचा सांभाळ करत आहे.
- सुलभच्या प्रवक्ते मदन झा यांनी सांगितले की, वृंदावनच्या 5 विधवांनी मोदींना राखी बांधली. सोबतच मोदींना 1500 राख्या गिफ्ट करण्‍यात आल्या आहेत.
- वृंदावनमध्ये मीरा सहाभिनी आश्रमात राहाणार्‍या महिला राखी बनवण्याचे काम करतात.
- मोदी यांचे छायाचित्र असलेली राखी दाखवत 94 वर्षीय मनु घोष यांनी सांगितले की, राखी त्यांनी स्वत: तयार केली आहे. पंतप्रधान यांना राखी बांधून प्रचंड आनंद झाला.

कोणी कुठे साजरी केले रक्षाबंधन
- लखनऊमध्ये अखिलेश यादव यांनी आपल्या निवासस्थानी राखी बांधून घेतली. ओवाळणीत एक-एक हजार रुपये दिले.
- लालू प्रसाद यादव यांना पाटणा येथील निवासस्थानी महिलांनी राखी बांधली.

आणखी फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...