आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम मोदींची पाकिस्तानी बहीण; 21 वर्षांपासून बांधते राखी, पंतप्रधानांनी दिल्लीला बोलावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानी वंशाच्या कमर मोहसीन शेख गेल्या 21 वर्षांपासून राखी बांधत आहेत. 2 दशकांपासून मोदींच्या राखी बहीण कमर एकदाही त्यांना रेशीम गाठ बांधायला विसरल्या नाहीत. कराची येथे राहणाऱ्या कमर 1981 मध्ये पहिल्यांदाच भारतात आल्या होत्या. त्यांचा निकाह अहमदाबाद येथील कलाकार मोहसीन यांच्याशी झाला आणि तेव्हापासून त्या भारतीय बनल्या.
 
 
गुजरातचे राज्यपाल त्यांना मुलगी मानत...
- माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 1995 मध्ये कमर यांची गुजरातचे तत्कालीन राज्यपाल डॉ. स्वरूप सिंह यांच्याशी झाली. सिंह कमर यांना आपली मुलगी मानत होते.
- त्या एकदा पाकिस्तानला जात होत्या. त्यावेळी राज्यपाल सिंह तत्कालीन भाजप नेते नरेंद्र मोदींसह कमर यांना विमानतळावर सोडण्यासाठी गेले होते. 
- कमर यांना निरोप देताना सिंह यांनी मोदींचा परिचय करून दिला आणि म्हणाले, ही माझी मुलगी आहे. त्याचवेळी मोदी म्हणाले, ही तुमची मुलगी आहे, तर माझी बहीण झाली. यानंतर 1996 पासून आतापर्यंत मोदींना त्या दररोज रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधतात.
बातम्या आणखी आहेत...