आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SEX करणेही सरकार शिकवणार का ? पोर्न साइड्स बॅनवर RGV भडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामगोपाल वर्मा यांनी केलेले ट्वीट. - Divya Marathi
रामगोपाल वर्मा यांनी केलेले ट्वीट.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पोर्न साइट्सवर बॅन आणले आहे. मात्र, चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा ( RGV) भडकले असून, सरकार आता सेक्‍स करणेही शिकवणार का ? असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केला आहे. या बाबत त्‍यांनी आज (मंगळवारी) ट्वीट केले.

वर्मा यांनी सोमवार आणि मंगळवारी अनेक ट्वीट करून या निर्णयाचा विरोध केला आहे. त्‍यांनी थेट मोदी यांचे नाव न घेता म्‍हटले, ''सोशल मीडियाने त्‍यांनी मोठे केले आहे आणि आज तेच त्‍यांचे हात कापत आहेत. पण, आता सोशल मीडियासुद्धा कडवे उत्‍तर देईल.'' वर्मा एवढ्यावरच थांबले नाहीत. त्‍यांनी म्‍हटले, '' त्‍यांनी केवळ बॅनच लावले नाही तर मला वाटते की, सरकार लवकरच बेडरूममध्‍ये घुसून सेक्‍स करताना पाहायला मागे पुढे पाहणार नाही. तसेच सेक्‍स कसा करावा आणि कसा करू नये, याच्‍या सूचना सरकार देईल''

आकडेवारीही दिली

रामगोपाल वर्मा यांनी म्‍हटले, ''भारतीय व्‍यक्‍तींना पोर्न पसंद आहे. याचा पुरावा म्‍हणजे इंटरनेट यूजच्‍या बाबतीत भारत पाचव्‍या स्‍थानी आहे. पोर्नहब वेबसाइट पाहणा-यांपैकी 50 टक्‍के भारतीय मोबाइलवर त्‍यांना अॅक्सेस करतात. भारताच्‍या पोर्न व्‍हीजिटर्समध्‍ये 25 टक्‍के महिला आहेत. त्‍यातील 23 टक्‍के ग्लोबल आहे. याचाच अर्थ येणा-या निवडणुकीमध्‍ये सरकारचे एवढे मतदान कमी झाले आहे. ''

मीडियाच्‍या वृत्‍तानुसार, भारतात 800 पेक्षा अधिक पोर्न वेबसाइट्स ब्लॉक केली गेली. या साइट्सला अॅक्सेस करण्‍याचा प्रयत्‍न केला असता “Your requested URL has been blocked as per the directions received from Department of Telecommunications, Government of India. Please contact administrator for more information.” चा मॅसेज दिसत आहेत. त्‍यानंतर सोशल मीडियावरून या विरोधात कडव्‍या प्रतिक्रिया आल्‍यात.

पुढील स्लाइड्सवर पाहा रामगोपाल वर्मा यांनी काय केले ट्वीट...