आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबरी वाद : आधी वादग्रस्त जागेची मालकी ठरवू, मग पूजेचा अधिकार - कोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कित्येक वर्षांपासून राममंदिर बांधण्यासाठी राजस्थानातून दगडही मागवला जात आहे. - Divya Marathi
कित्येक वर्षांपासून राममंदिर बांधण्यासाठी राजस्थानातून दगडही मागवला जात आहे.
नवी दिल्ली- अयोध्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सात वर्षांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुमारे दीड तास सुनावणी चालली. या प्रकरणाशी संबंधित १८ हजार पानी कागदपत्रे इंग्रजीत नसल्याने सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. ६ डिसंेबर रोजी वादग्रस्त ढाचा पाडण्यास २५ वर्षे पूर्ण होतात.  

आधी अयोध्येच्या वादग्रस्त जागेची मालकी कोणाकडे आहे हे ठरवले जाईल. नंतरच पूजेच्या अधिकाऱ्यांवर सुनावणी होईल, असे न्या. दीपक मिश्रा यांनी म्हटले. न्यायालयाने सर्व प्रतिवादींना हिंदी, पाली, उर्दू, पर्शियन, गुरुमुखी अशा ८ भाषांत उपलब्ध असलेल्या १८ हजार पानांचा १२ आठवड्यांच्या आत अनुवाद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाची ९ हजार पाने हिंदीत, तर उर्वरित ९ हजार पानांचा दस्तऐवज आणि नोंदवलेल्या साक्षी इत्यादी  बाबी उर्दू, हिंदी, पाली, संस्कृत, पर्शियन, गुरुमुखीसह आठ भाषांमध्ये आहेत.
 
6 डिसेंबर 1992 ला पाडण्यात आली होती बाबरी मशिद 
- बाबरी मशिदीचा मुद्दा गाजायला सुरुवात झाली ती 1989 मध्ये. यामुळे तेव्हा देशात धार्मिक तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून देशाच्या राजकारणावर या मुद्द्याचा प्रभाव राहिला आहे. 
- हिंदू संघटनांचा दावा आहे की अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर बाबरी मशिद उभारण्यात आली आहे. 
- राम मंदिर आंदोलनादरम्यान, 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. 
बातम्या आणखी आहेत...