आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Jethmalani Announces ‘break up’ With Modi

राम जेठमलानींची मोदींशी फारकत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व राज्यसभा खासदार राम जेठमलानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून फारकत घेत असल्याचे जाहीर केले आहे. ते म्हणाले की, मोदींविषयी माझ्या मनात आदर कमी होत - होत आता पूर्णपणे संपुष्टात आला आहे.
राज्यसभेचे खासदार जेठमलानी यांनी सीबीडीटीचे माजी अध्यक्ष के. व्ही. चौधरी यांना केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) म्हणून नियुक्त करण्यास जेठमलानींचा तीव्र विरोध होता३ त्यांनी त्यासाठी पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना पत्र लिहून त्यांचा विरोध व्यक्तही केला होता. परंतु सोमवारी राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर जेठमलानींनी मोदींना पत्र लिहून त्या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात अाव्हान देणार असल्याचे संकेत िदले आहेत.