आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशातील हाय प्रोफाइल वकील, करिअरची सुरुवात केली परदेशातून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री लीना चंदावरकरसोबत जेठमलानी (फाइल) - Divya Marathi
एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री लीना चंदावरकरसोबत जेठमलानी (फाइल)
नवी दिल्ली- ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांचा उद्या (14 सप्टेंबर) वाढदिवस आहे. या निमीत्त त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती DivyaMarathi.com देत आहे. जेठमलानी यांचा जन्म फाळणीआधीच्या सिंध प्रांतातील शिकारपूर (आता पाकिस्तानात असलेल्या पंजाब) येथे झाला होता. लहानपणापासून ते तल्लख बुद्धीचे होते. त्यामुळेच त्यांनी 2री, 3री, 4थी या तीन वर्गांचा अभ्यास एकाच वर्षी केला होता.
 
13 व्या वर्षी मॅट्रिक आणि 17व्या वर्षी LLB
कुशाग्र बुद्धीमत्तेचे राम जेठमलानी यांनी 10 वी अर्थात तत्कालिन मॅट्रिकची परीक्षा 13 व्या वर्षी उत्तीर्ण केली होती. वकीलीचे शिक्षण अर्थात LLB त्यांनी 17 व्या वर्षी पूर्ण केले. तेव्हा वकिली व्यवसाय करण्यासाठी 21 वर्षे पूर्ण असणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांची कुशाग्र बुद्धीमत्ता पाहून तेव्हा एक विशेष प्रस्ताव पारित करण्यात आला आणि त्यांना वयाच्या 18 व्या वर्षी वकिली व्यवसाय (प्रॅक्टिस) सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानतंर त्यांनी एस.सी.सहानी लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. पूर्ण केले.

आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींवर टीका केल्यामुळे कॅनडामध्ये केले आत्मसमर्पण
जेठमलानी यांनी आणीबाणी काळात तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या विरुद्ध केरळच्या एका कोर्टातून अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र 300 हून अधिक वकिलांनी मुंबई हायकोर्टातून या वॉरंटला स्टे-ऑर्डर मिळवली होती. मात्र ती देखील रद्द झाली. त्यानंतर कॅनडामध्ये आणीबाणीचा विरोध करणाऱ्या जेठमलानी यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, त्या दोन महिलांबद्दल ज्यांच्यासोबत जेठमलानींनी केला विवाह
बातम्या आणखी आहेत...