आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Jethmalani Controversial Statement Against Bjp

जेठमलानी म्हणाले - खून प्रकरणातून शहांची सुटका करण्यास नकार दिल्याने BJP ने मला काढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - राम जेठमलानी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी ते म्हणाले, विद्यमान भाजप अध्यक्ष अमित शहांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी 2010 मध्ये मला बोलावण्यात आले होते, मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली.

जेठमलानी म्हणाले - वाजपेयी मला घाबरत होते...
-'मी भारतीय जनता पक्षाचा संस्थापक सदस्य होतो, जेव्हा प्रथम अटल बिहारी वाजपेयींचे सरकार स्थापन झाले तेव्हा मला शहर विकास मंत्री केले गेले.'
-'मला कायदेमंत्री होण्याची इच्छा होती, मात्र अटलजींनी विधी खाते जयललितांच्या नातेवाईकाला देण्याचा निर्णय केला होता.'
-'अटलजी मला घाबरत होते, माझ्या उत्तररावर ते काही बोलू शकत नव्हते. ते मला एवढे घाबरत होते, की त्यांनी घोषणा केली होती की याला आपण एकना एक दिवस शहर विकास मंत्रीपदावरुन काढू.'
-'अखेर त्यांनी मला कायदा मंत्री केले. या खात्यात काम करत असताना मी एक महत्त्वाचे काम केले तर त्यांनी माझा राजीनामा मागितला.'
-'यावर मी कोणताही विचार न करता त्यांना फॅक्स पाठवून दिला. तेव्हा पासून आजपर्यंत मी अटलजींचे तोंड पाहिलेले नाही.'

मोदी पंतप्रधान झाल्यामुळे भाजपचे महत्त्वाचे नेते नाराज
- जेठमलानी म्हणाले, 'मोदी पंतप्रधान झाल्यामुळे भाजपमधील काही महत्त्वाचे नेते नाराज झाले. त्यांना फार आनंद झाला नाही.'
- 'मला हे सांगताना लाज वाटते की, मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान नाही तर ते दुसऱ्या देशाचे पंतप्रधान आहेत.'
- 'मी लोकांना आवाहन करेल की तुमचे एक मत फार महत्त्वाचे आहे. ते देण्याआधी तुम्ही त्या उमेदवाराची पार्श्वभूमी आणि त्याचे चरित्र नक्कीच तपासले पाहिजे.'
- 'जो जनतेच्या हिताचे काम करेल, आणि ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे ज्याला लोकशाहीची चिंता आहे, अशाच व्यक्तीला मत द्या.'