आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेठमलानींचा खुलासा - आसाराम म्हणाले होते, जजशी बोललाे, कोर्टात काही बाेलू नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजस्थानातील राज्यसभा खासदार व ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी अासाराम बापू खटल्याशी आपला काहीच संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. आसाराम यांच्या एका पेशीसाठी आपण जोधपूरला गेलो होतो. परंतु तेथे त्यांनी २० वकिलांचा ताफा तयार ठेवला होता. मला म्हणाले की, कोर्टात तुम्ही काहीच बोलू नका, जजशी बोलणे झाले आहे. त्यानंतर मी पुन्हा त्यांच्या खटल्याकडे पाहिलेदेखील नाही. आसाराम आजतागायत तुरुंगात आहेत. स्पष्ट आणि सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राम जेठमलानी यांनी दिव्य मराठी नेटवर्कशी बोलताना निर्भया प्रकरण, मुलींवरील अत्याचार यासह विविध मुद्यांवर परखड मते मांडली. त्यांच्याशी झालेला संवाद :

{कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी, त्याचा खुलासा करणाऱ्यांना सुरक्षा, मुलींचे लैंगिक शोषण व गुन्हे थांबवण्यासाठी कायद्या कोणते बदल असावेत, असे तुम्हाला वाटते?
-देशात पाच वर्षाच्या मुलीसोबतही अशा प्रकारचे अत्याचार होतात, यावर माझा विश्वासच बसत नाही. असे तर केवळ जनावरच करू शकतो. देशात लोकसंख्येच्या तुलनेत सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. विध आयोगानेदेखील देशाला १६ पट न्यायाधीशांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. परंतु सरकार त्यावर खर्च का करू इच्छित नाही हे मला कळत नाही.

{तुम्ही मुलींसंदर्भात संवेदना व्यक्त करत होता. आणि दुसरीकडे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा आरोप असलेल्या जोधपुर तुरुंगात असलेल्या आसाराम बापूंची पैरवी करण्यासाठी जाता हे दुटप्पी भूमिका आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
-मी केवळ एका सुनावणीसाठी जोधपूरला गेलो होतो. तेव्हा मला जाणवले की, अासाराम बापूंनी २० - २० वकिलांची फौज जवळ बाळगली आहे. ते मला सांगतात की, तुम्ही काहीच करू नका, आमचे जजशी बोलणे झाले आहे, तेव्हा मी माघारी आलो. नंतर कधीच त्या खटल्याशी माझा संबंध आला नाही. ते आजदेखील तुरुंगात आहे. स्वाभाविकच आहे, त्यांच्याकडे तशाच दर्जाचे वकील आहेत.

{निर्भया प्रकरणातील आरोपी घटनेच्यावेळी १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा होता. सध्याच्या तरतुदींमुळे तो सुटला आहे. निर्णयाविरोधात लोकांनी निदर्शने केली. हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत त्यात दुरुस्ती करावी, अशी त्यांची मागणी आहे. तुम्ही काय सांगाल?
-हा िनर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल. परंतु याबाबत मी दावा नाही करू शकत की, ज्या कायद्याच्या आधारे हा निर्णय घेतला गेला तो योग्य आहे की चुकीचा. या कायद्यात बदल करणे गरजेचे असेलही. परंतु जे लोक निर्भया कांडातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेवर आंदोलन करून कायद्यात बदलाची मागणी करत आहेत ते केवळ प्रसिद्धी मिळवू इच्छितात. कायदा दुरुस्ती झाली तरीही ती भविष्यातील प्रकरणांसाठी लागू असेल. आधीच्या खटल्यांसाठी तो लागू केला तर ते तत्वांविरुद्ध असेल.
पुढील स्लाइडमध्ये, घोटाळेबाजांना तुरुंगात धाडून वयाची शंभरी पूर्ण करेन