आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम माधव यांचा आमिरला सल्ला, \'पत्नीलाही भारताच्या गौरवाबद्दल सांगा\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप नेते राम माधव - Divya Marathi
भाजप नेते राम माधव
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे महासचिव राम माधव यांनी अभिनेता आमिर खानला पत्नीलाही भारताच्या गौरवाबद्दल सांगण्याचा जाहीर भाषणातून सल्ला दिला आहे. ते म्हणाले, 'आमिरने केवळ ऑटो रिक्शा चालकांना नाही तर स्वतःच्या पत्नीलाही भारताच्या गौरवाबाद्दल सांगावे.' देशातील वाढत्या असहिष्णुतेवर आमिरने टिप्पणी केल्यानंतर त्याला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. नुकतेच त्याला पर्यटन विभागाच्या 'अतुल्य भारत' मोहिमेच्या ब्रँड अँबेसिडर पदावरुन हटवण्यात आले आहे.

काय म्हणाले राम माधव
- भाजप महासचिव माधव यांनी दिल्लीतील खालसा महाविद्यालयातील भाषणातून आमिरला सल्ला दिला.
- माधव म्हणाले, 'आमिर ऑटो वाल्याला समजावतो की देशाचा वारसा जपला पाहिजे. त्याने हेच त्याच्या पत्नीलाही सांगितले पाहिजे.'
- यापुढे देशातील कलाकारांना पुरस्कार वापसी करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास माधव यांनी यावेळी दिला. त्यासोबत ते म्हणाले, 'त्यासाठी त्यांनी देशाचा मान राखण्याची गरज आहे.'
- 'शेजारी देशासोबत आपले चांगले संबंध आहेत. मात्र देशाच्या संरक्षावर आणि आत्मसन्मानाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.'

काय म्‍हणाला होता आमिर
आमिरने देशातील असहिष्णुतेबद्दलचे वक्तव्य केले होते. 'आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, हे मी एक व्यक्ती, एक नागरिक आणि या देशाचा एक भाग म्हणून आपण वर्तमानपत्रांतून वाचतो, टीव्हीवर पाहतो. त्यामुळे निश्चितपणे मी धास्तावलेलो आहे. हे नाकारू शकत नाही. अनेक घटनांनी मला चिंतेत टाकले. मुलांच्या सुरक्षेबाबतच्या भीतीमुळे एकदा तर पत्नीने (किरण राव) भारत सोडून जायचे का, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे आमिरने म्हटले होते. आमिरच्या वक्तव्यावरुन देशात चौफेर रान पेटले होते. सोशल मीडियावर तर आमिरच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला.
पुढील स्लाइडमध्ये, काय होता असहिष्णुतेचा वाद
बातम्या आणखी आहेत...