आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीच्या घरात आम्ही बहिण-भाऊ विचार करायचो, पाऊस कधी थांबणार... कोविंद झाले भावूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएम मोदी यांनी कोविंद यांच्या कुटुंबियांसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. - Divya Marathi
पीएम मोदी यांनी कोविंद यांच्या कुटुंबियांसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
नवी दिल्ली - रामनाथ कोविंद देशाचे 14 सर्वोच्च घटनात्मक प्रमुख होणार आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर कोविंद यांनी भावूक होत लहानपणाच्या गरीबीची आठवण काढली. तसेच आपली निवड होणे हे लोकशाहीच्या महानतेचे प्रतिक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पीएम नरेंद्र मोदींनी कोविंद यांच्यासह त्यांच्या प्रतिस्पर्धी राहिलेल्या मीरा कुमार यांनाही शुभेच्छा दिल्या. आपण लोकशाही भावनेसह ही निवडणूक लढली, त्यामुळे आम्हाला तुमच्या गर्व आहे असे पीएम मोदी म्हणाले आहेत. 
 
रामनाथ कोविंद म्हणाले...
- "हा अतिशय भावूक क्षण आहे. दिल्लीत आज पाऊस सुरू आहे. या वातावरणात मला लहानपणीच्या गावाची आठवण आली. मातीच्या भिंती आणि छप्पराच्या झोपडीत राहणारे आम्ही बहिण-भाऊ विचार करत असायचो, की हा पाऊस कधी थांबणार? कितीतरी असेच रामनाथ असतील जे शेती आणि मजूरी करत असतील. जीवनात संघर्ष करत असतील. आज परौंख गावाचा कोविंद त्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती झाला आहे."
 
- "या पदावर निवडून येणे माझे लक्ष्य नव्हते. मी कधीही याबाबत विचार केला नव्हता. देशासाठी अथक सेवा मला इथपर्यंत घेऊन आली आहे. राज्यघटनेचे संरक्षण करणए आणि त्याची मर्यादा कायम राखणे हे माझे कर्तव्य राहणार आहे. मी राष्ट्राच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन... देशाच्या लोकांचे खूप-खूप आभार, ज्या पदावर राहण्याचा गौरव राजेंद्र प्रसाद, राधाकृष्णन, एपीजे अब्दुल कलाम, प्रणब मुखर्जी अशा विद्वानांनी वाढवला आहे, त्या पदावर बसणे मला जबाबदारीची जाणीव करून देत आहे."
 
 
पीएम मोदी काय म्हणाले?
- "कोविंद यांना विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा" मोदींनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांनाही शुभेच्छा दिल्या. मीरा कुमार यांनी लोकशाही भावनेसह ही निवडणूक लढवली. आम्हा सर्वांना त्याबद्दल गर्व आहे. 

प्रणव मुखर्जी
"देशाचे 14 वे राष्ट्रपती झाल्याबद्दल रामनाथ कोविंद यांना हार्दिक शुभेच्छा..."
 
 
मीरा कुमार 
"मी माननीय कोविंदजी यांना भारताचे राष्ट्रपती पदी निवडून आल्याबद्दल शुभेच्छा देते. कठिण समयी त्यांच्यावर संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आली आहे. माझा उत्साह वाढवण्यासाठी सोनिया गांधी आणि देशवासियांचे धन्यवाद... ज्या विचारधारेसह मी या निवडणुकीत उतरले होते. त्याच विचारधारेवर माझा संघर्ष यापुढे देखील असाच सुरू राहणार आहे."
बातम्या आणखी आहेत...