आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास अधिकारी डागर यांनी पीडितेला कोर्टात आणले, जाणुन घ्‍या खटल्याचा पूर्ण इतिहास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डेरा सच्चा सौदाची स्थापना १९४८ मध्ये शाह मस्तानने केली होती. गुरमीत राम रहिम सिंह यांनी १९९० मध्ये डेराची धुरा घेतली. परंतु नव्वदपासूनच डेरा वादात अडकला. तीन चित्रपट बनवलेल्या राम रहीम यांच्यावर हत्या, नपुंसक बनवल्याचाही आरोप आहे.
 
खटल्याचा पूर्ण इतिहास...
२००२ मध्ये एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांना पत्र लिहून अत्याचाराबद्दल तक्रार केली होती.
- एप्रिल २००२ मध्ये एका साध्वीने उच्च न्यायालय आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र पाठवले.
- मे २००२ मध्ये डेरा प्रमुखाशी या पत्रातील आरोपाबाबत सिरसाचे सत्र न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना.
- सप्टेंबर २००२ मध्ये हायकोर्टाने प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करून घेण्याचे आदेश दिले.
- डिसेंबर २००२ मध्ये चंदिगड सीबीआय गुन्हे शाखेने राम रहिम यांच्या विरोधात ३७६, ५०६ व ५०९ अंतर्गत खटला दाखल करून चौकशी सुरू केली.
- डिसेंबर २००३ ते ऑक्टोबर २००४ पर्यंत डेरा प्रमुखाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पुढे स्थगिती हटवून सीबीआय तपासाचे आदेश दिले.
- २००५-२००६ दरम्यान अनेक तपास अधिकारी बदलले. अत्याचार झालेल्या साध्वीला तपास अधिकारी सतीश डागर यांनी शोधून काढले.
- जुलै २००७ मध्ये अंबाला आणि नंतर हे प्रकरण पंचकुला न्यायालयात वर्ग झाले.
- ऑगस्ट २००८ मध्ये सुनावणी सुरू झाली आणि डेरा प्रमुखाच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले. २००९-२०१० मध्ये दोन पीडिता समोर आल्या.
- जुलै २०१६ मध्ये खटल्यादरम्यान ५२ साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या. त्यात १५ पक्षकारांच्या बाजूने तर ३७ बचाव पक्षाचे होते.
- जून २०१७ मध्ये डेरा सच्चा सौदा प्रमुखाने परदेशात जाण्यासाठी कोर्टात अपील केले. कोर्टाने परदेशात जाण्यास मनाई केली होती.
- २५ जुलै २०१७ रोजी कोर्टाने रोज सुनावणी करण्याचे निर्देश दिले. सुनावणीची जलदगतीने निपटण्याचे आदेश दिले.
- १७ आॅगस्ट २०१७ रोजी सुनावणी संपली. २५ ऑगस्ट रोजी दोषी ठरवले. आता २८ ऑगस्टला शिक्षा ठोठावली जाणार आहे.
 
अन्य नऊ मोठे वाद
- मुलाच्या मृत्यूवरून पत्रकारांचा वाद.
- कुरुक्षेत्र येथे रणजीत सिंह यांच्या हत्येचा आरोप.
- पत्रकार छत्रपतीवर हल्ला व हत्येचा आरोप.
- गुरु गोविंद सिंहसारखी वेशभूषेवरून वाद.
- निदर्शनावेळी शीखांवर गोळीबाराचा आरोप.
- बंदी असतानाही नामचर्चा व गोळीबाराचा आरोप.
- डेराचे माजी व्यवस्थापक गूढरित्या गायब.
- डिसेंबर २०१२ मध्ये गुरुद्वारावर हल्लाबोल केल्याचा आरोप.
- डेरातील साधूंना नपुंसक केल्याचा आरोप.
 
WHAT NEXT: हरियाणा-पंजाबातील राजकीय समीकरण बदलणार 
- पंजाब विद्यापीठीताली शहीद भगतसिंह अध्यासनाचे प्रोफेसर रौनकीराम म्हणाले, 'पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक नेते हे गुरमीतसिंह रामरहिम यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे अनेक पक्षांचे सरकारही स्थापन झालेले आहे. रामरहिम यांच्या अटकेने पंजबा आणि हरियाणा या राज्यांचे राजकीय समीकरण बदलू शकते.'
- बाबा-बुवांचे समर्थन लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगत रौनकीराम म्हणाले,'यामुळे तात्पुरात फायदा होतो, मात्र याचे दुरगामी परिणाम होऊ शकतात. त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात.' सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच लोक बाबा-बुवांच्या मागे लागतात असाही आरोप रौनकीराम यांनी केला. ते म्हणाले, 'सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच लोक बाबा-बुवांकडे जातात. डेरे आणि आश्रम त्यांच्या मुला-मुलींचे शिक्षण, लग्न यासाठी मदत करतात. एवढेच नाही तर रोजगार आणि सामाजिक कार्यातही मदत करतात.'
- शहीद भगतसिंह अध्यासनाचे प्रोफेसर म्हणाले, की जर हेच सर्व काम सरकारने केले तर लोकांना दाखवण्यासाठी डेरे आणि आश्रमांकडे दुसरे कोणतेही आमिष उरणार नाही. रौनकीराम म्हणाले, 'विशेष म्हणजे डेरा प्रमुख किंवा संत कधीही राजकीय पक्षांकडे जात नाही, उलट राजकीय नेते त्यांच्याकडे चालत येतात. कारण डेरा प्रमुख, संताच्या एका शब्दावर त्यांचे समर्थक त्यांना मतदान करतात.'
 
पुढील स्‍लाइडवर...वर्ल्ड मीडियातही रॉकस्टार बाबा चमकले..
बातम्या आणखी आहेत...