नवी दिल्ली - डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहिमची मानसकन्या
हनीप्रीतला बुधवारी पंचकुला कोर्टाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राम रहिमला विशेष सीबीआय कोर्टाने आधीच 20 वर्षांची शिक्षा सुनावली असून तो तुरुंगात आहे. 25 ऑगस्टपासून हरियाणा पोलिसांना गुंगारा देणारी हनीप्रीत मंगळवारी मीडियासमोर आली आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली होती.
हनीप्रीत 39 दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. मंगळवारी एका टीव्ही चॅनलला मुलाखत देऊन ती जगासमोर आली. या मुलाखतीत तिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळले. बाबा आणि तिच्या संबंधवरुन होत असलेल्या आरोपांनाही तिने उत्तर दिले. बाप-लेकीच्या नात्याला अशाप्रकारे बदनाम केले गेले की मला स्वतःचीही भीती वाटायला लागली होती, असे ती म्हणाली.
हनीप्रीत ही बाबाची मानसकन्या असल्याचे सर्वांना माहित आहे, मात्र राम रहिमला सख्ख्या दोन मुली देखील आहे. आज त्यांची ओळख आम्ही तुम्हाला करुन देणार आहोत.
असे आहे राम रहिमचे कुटुंब
- राम रहिमला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठ्या मुलीचे नाव चरणप्रीत आणि छोटीचे नाव अमरप्रीत आहे.
- बाबाने हनीप्रीतला 1999 मध्ये दत्तक घेतले होते. तेव्हापासून तो मला तीन मुली आहे, असे सांगायचा.
जावई माजी आमदाराचा मुलगा
- राम रहिमची मोठी मुलगी चरणप्रीत हिचा पती डॉ. शान-ए-मीत इन्सा आहे. छोटी मुलगी अमरप्रीतच्या पतीचे नाव रुह-ए-मीत इन्सा असे आहे.
- त्याच्या मुलाचे नाव जसमीत आहे. त्याचे लग्न भटिंडा येथील माजी आमदार हरमिंदरसिंग जस्सी यांची मुलगी हुस्नमीत इन्सा सोबत झाले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, राम रहिमची फॅमिली...