आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर: भागवतांचे वक्तव्य भाजपला तारक की मारक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्या अतुट नात्याबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. संघ दिशा ठरवतो आणि त्यानुसार भाजप मार्गक्रमण करत असतो. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपला संघाच्या 'शिस्ती'मुळेच यश मिळत आले आहे. हे दोन्ही संघटना नाकारत असल्या तरी हे सत्य आहे. मात्र, संघाच्या अजेंड्यावरील विषय कधीच उघड-उघड भाजपच्या निवडणूक अजेंड्यावर नसतात, हेही तेवढेच सत्य आहे. असाच एक विषय आहे अयोध्येतील राममंदिराचा.
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 2 डिसेंबर रोजी कोलकाता येथे म्हटले, 'अयोध्येत राममंदिर होणार आणि ते माझ्या हयातीतच होणार. पण हे कोणी सांगू शकत नाही की ते कधी आणि कसे होणार. आशा करु या की आपल्या डोळ्यांदेखत ते होईल.'
सरसंघचालकांच्या कोलकात्यातील या वक्तव्याने दिल्लीतील संसदेत गदारोळ झाला. रामजन्मभूमीचा मुद्दा न्यायालयाच्या कक्षेत आहे. मात्र तरीही भागवतांनी कोलकता येथे त्याबद्दल उल्लेख केला. याला पार्श्वभूमी असूशकते पुढील वर्षी होऊ घातलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची.

पुढील स्लाइडमध्ये,
ओवेसी म्हणाले - बाबरी मशिदच बनणार
आझम खान म्हणाले - मशिद बांधली तर भाजपला पुन्हा सत्ता
बातम्या आणखी आहेत...