आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Vilas Paswan, BJP Seal Deal, Change Bihar Equations News In Marathi

डावे, उजवे सगळ्याच पक्षांचे सगळे पर्याय खुले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजवण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी आहे. काँग्रेस,भाजपसह सगळेच राजकीय पक्ष नव्या मित्र पक्ष,युती अथवा आघाडीची जुळवाजुळव करण्याच्या मागे आहेत.काहींचे जुने मित्र पक्ष आता हाडवैरी बनत आहेत तर काही हाडवैरी गळ्यात गळे घालण्यासाठी उत्सकु आहेत.

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडने 17 वर्ष जुना मित्र पक्ष भाजपशी फारकत घेतली तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आता रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष काडीमोड घेण्याच्या तयारीत आहेत.पंतप्रधान बनण्याची महत्वाकांक्षा बाळगून असलेले मुलायमसिंह यादव तिसºया आघाडीची मोट बांधण्यात पुढाकार घेत आहेत. तर भाजपने बिहारमध्ये पासवान, उत्तर प्रदेशात दलित नेते उदीत राज,महाराष्ट्रात रामदास आठवले यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणण्यात यश मिळवले आहे. दक्षिणेत तामिळनाडूत काँग्रेस-द्रमुक आणि अभिनेते विजयकांत यांचा डिएमडिके अशी आघाडी आकारत आहे.तर विभाजनाच्या निर्णयानंतर आंध्र प्रदेशात तेलंगणा राष्ट्रीय आघाडीस काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यासाठी गळ टाकण्यात आला आहे.

राजदशी संबंध तुटले : पासवान
बिहारमध्ये नवी समीकरणे उदयास येत आहेत.गेल्या महिन्यापर्यंत काँग्रेस-राजदसोबत आघाडी करण्यास उत्सुक असलेले लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांनी आता रालोआचा रस्ता धरला आहे. बुधवारी त्यांनी भाजपसोबत आघाडी करण्याचे संकेत दिले. राजद-काँग्रेस या दोन्ही पक्षांनी लोजपची उपेक्षा केली आता आमच्यात संपर्क नाही. पक्ष नव्या पर्यायांचा विचार करीत आहे असे पासवान यांनी सांगितले.

आठ जागांवर लढणार
नव्या आघाडीतील फॉर्म्युल्यानुसार बिहारमधील 40 पैकी आठ जागांवर लोजप लढणार असून उर्वरित 32 जागा भाजपच्या वाट्यास येतील.रामविलास पासवान हाजीपूर,त्यांचे बंधू रामचंद्र समस्तीपूर तर मुलगा चिराग जमुई येथून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जाते.

तेलंगणाच्या अधिकृत निर्मीतीनंतर निर्णय
तेलंगणानिर्मीतीनंतर आता टीआरएसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यास टीआरएसचे नेते उत्सुक आहेत असे आंध्र प्रदेशचे प्रभारी व काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी बुधवारी सांगितले. मात्र टीआरएस नेते चंद्रशेखर राव यांचे पुत्र केटी रामराव यांनी त्याचा इन्कार केला. अधिकृत स्वतंत्र तेलंगणाची निमीती झाल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

सर्वांचीच चाचपणी
भाजप-काँग्रेससह बिजू जनता दल,माकप,भाकप,तृणमूल काँग्रेस,अण्णा द्रमुक,आसाम गण परिषद यांसारखे राष्ट्रीय व छोटे-मोठे प्रादेशिक पक्ष सगळेच पर्याय खुले असल्याचे सांगत आहेत.