आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Vilas Paswan First Marriage Creates Controversy Election News Live

पत्नीच्या प्रकरणात कुठे गेली नैतिकता? मोदीनंतर रामविलास पासवान यांना सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शपथपत्रामध्ये पत्नीच्या नावाचा उल्लेख केला आहे. (वाचा, नगमा म्हणाली, लग्नाच्या वेळी मोदी अल्पवयीन नव्हते) त्यावरुन ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एनडीएमध्ये सामील झालेले लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान पहिल्या पत्नीचे नाव दडवल्या प्रकरणी वादात अडकताना दिसत आहेत. रामविलास पासवान यांच्यावर दोन लग्न केल्याचा आरोप असून पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिल्याशिवाय त्यांनी रिना यांच्याशी विवाह केला आणि पहिलीकडे दुर्लक्ष केले आहे.
निवडणूकीच्या काळात विरोधक कोणता मुद्दा शोधून काढतील याचा काही नेम नसतो. याची प्रचिती पासवान यांना आता येत आहे. नैतिकतेच्या गप्पा मारणारे रामविलास पासवान यांनी पतिधर्माचे पालन केले नसल्याचा आरोप त्यांचे विरोधक करीत आहेत. यावर स्पष्टीकरण देताना पासवान म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून पहिल्या पत्नीपासून मी वेगळा राहात आहे. 1980 पासून निवडणुकीत मी तिचे नावही माझ्यासोबत जोडलेले नाही. यावेळी देखील गेल्या 30 वर्षांचाच कित्ता गिरवल्याचे ते सांगत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण आहे पासवान यांची पहिली पत्नी?