आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यम घोटाळा : राजूसह सर्व 10 आरोपींना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पाच कोटी रुपये दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बहुचर्चित सत्यम घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने सत्यम कम्प्यूटर्सचे प्रमोटर रामलिंग राजूसह 10 आरोपींना दोषी ठरवत सर्व दहा जणांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या घोटाळ्यात राजूशिवाय त्याचा भाऊ आणि सत्यमचा माजी व्यवस्थापकीय संचालक बी. रामा राजू, माजी सीएफओ व्ही. श्रीनिवास, माजी पीडब्ल्यूसी ऑडिटर सुब्रमणि गोपालकृष्णन, टी. श्रीनिवास, बी. सूर्यनारायण राजू, जी. रामकृष्णा, डी. व्यंकटपती राजू आणि सी.एच.श्रीसैलम आणि सत्यमचे माजी मुख्य लेखापरिक्षक व्ही.एस. प्रभाकर गुप्ता यांचा समावेश आहे. या सर्वांवर गुन्हेगारी ष़डयंत्र, कटकारस्थान रचणे असे गुन्हे दाखल केले आहेत.
सहा महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या या खटल्यात 3000 कागदपत्र आणि 226 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सध्या सर्व आरोपी जामीनावर बाहेर आहेत.

हैदराबादची कंपनी सत्यमचे चेअरमन रामलिंगा राजूने जानेवारी 2009 मध्ये स्वतः मान्य केले होते, की त्यांनी त्यांच्या कंपनीचा नफा वाढवून सांगितला होता आणि कर्ज दडवून ठेवले होते. घोटाळा समोर येण्यापूर्वी कंपनीत 53 हजार कर्मचारी काम करत होते. फॉर्च्यून-500 च्या श्रेणीत येणार्‍या 185 कंपन्या सत्यमच्या क्लायंट होत्या. कंपनीचा कार्यविस्तार 66 देशांपर्यंत होता. डिसेंबर 2008 पर्यंत सत्यमचा एक शेअर 544 रुपयांना होता. मात्र, सत्यमचा घोटाळा समोर आल्यानंतर जानेवारी 2009 मध्ये कंपनीची पत घसरली आणि प्रती शेअरची किंमत 11 रुपयांवर आली. सीबीआयच्या माहितीनुसार, कंपनीने केलेल्या हेराफेरीमुळे गुंतवणूकदारांचे 14 हजार कोटी रुपये डुबले आहेत.

काय आहे सत्यम घोटाळा ?
=> देशातील सगळ्यात मोठ्या अकाउंटिंग घोटाळ्याचा भांडाफोड 7 जानेवारी 2009 रोजी झाला होता. सत्यम कॉम्प्युटरचे संस्‍थापक बी रामलिंगा राजू याने कंपनीच्या खतावणीत फेरबदल करून अनेक वर्षे कोट्यवधी रुपये अवैध पद्धतीने स्वत:जवळ जमा ठेवले.
=> राजू आणि त्याचा भावाला आंध्र प्रदेश पोलिसांनी 9 जानेवारी 2009 अटक केली.
सत्यम कॉम्प्युटरमध्ये घोटाळ्याला जवळपास पाच-सहा वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. सुमारे 10 कोटी रुपये समायोजनाने सुरु झाला होता. यानंतर तिमाही दर तिमाही सुरुच होता.
फेब्रुवारीत सीबीआयची चौकशी पूर्ण...
=> सत्यम घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) फेब्रवारी 2014 मध्ये आपली चौकशी पूर्ण केली. सीबीआयने तीन चार्जशीट फाइल केल्या होत्या. नंतर तिघांची एक केली होती.
=> राजूसह त्याचा भाऊ व अन्य तीन सहकार्‍यांवर फसवणूक, गुन्ह्याचे षड्यंत्र रचने, कटकारस्थानाशिवाय भादंविनुसार खतावणी तसेच उत्पन्नात फेरबदल, अकाउंटमध्ये खाडाखोड करणे, खोटे फि‍क्‍स्‍ड डिपॉझिट उघडण्याचे आरोप आहे.
=> नंतर टेक महिंद्राने सत्‍यम कॉम्प्युटर सव्हिर्सेस लिमिटेडला खरेदी केले.