आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ramayana, Mahabharata, Gita Lessons Soon In College

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामायण, महाभारताचे शाळा-कॉलेजांत धडे देणार; केंद्र सरकारचा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार शाळा - महाविद्यालयीन अभ्यासक्रमात महाभारत, रामायण आणि गीतेवरील धड्यांचा समावेश करणार आहे. देशाला ‘सांस्कृतिक प्रदूषण’मुक्त करणे व तरुणांत ‘मूल्यां’चा संचार करण्याच्या उद्देशाने हे पाऊल टाकले जात आहे. केंद्रीय सांस्कृतिक व मनुष्यबळ विकास मंत्रालय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक मूल्यांचे शिक्षण देण्याच्या योजनेवर काम करत आहे. भाजपशासित राज्ये, केंद्रीय शिक्षण तथा सांस्कृतिक मंत्री तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उच्चाधिकाऱ्यांत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हे पाऊल उचलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

याबाबत सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा म्हणाले, संघाचा विचारांना चालना देण्याच्या आरोपांचा आम्ही विचार करणार नाही. आपल्या संस्कृतीचा एक भाग म्हणून आम्ही त्याला आणत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना मूल्यांचे शिक्षण दिले जाऊ शकेल. त्यांना महाभारत, रामायण, गीता शिकवली पाहिजे. तसेच जात, वर्ग व धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व आध्यात्मिक मूल्यांचे शिक्षण दिले पाहिजे. ६० वर्षे एका खास राजकीय घराण्याची विचारसरणी शिक्षणपद्धतीत घुसडण्यात आल्याचा आरोप महेश शर्मा यांनी केला.