आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे नेते पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा होस्टेलमधून पोहोचले होते मंत्रालयात, आता नाव घ्यायला विसरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामदास आठवले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युतीकरुन शिवशक्ती-भीमशक्तीचा वेगळा प्रयोग महाराष्ट्रात केला होता. - Divya Marathi
रामदास आठवले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युतीकरुन शिवशक्ती-भीमशक्तीचा वेगळा प्रयोग महाराष्ट्रात केला होता.
नवी दिल्ली - बराच मोठा काळ सत्तेपासून दूर राहिल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. राज्यसभेवर त्यांची नियुक्ती होऊन दोन वर्षे झाली होती मात्र मोदी सरकारमध्ये त्यांची वर्णी केव्हा लागणार हे काही कळत नव्हते. महाराष्ट्रातील वजनदार दलित नेतृत्वापैकी एक असलेले रामदास आठवले हे काही पहिल्यांदा मंत्री झालेले नाहीत. याआधी 1990 मध्ये महाराष्ट्रात शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात ते राज्याचे समाज कल्याण मंत्री झाले होते. तेव्हा एक कफ्फलक तरुण थेट होस्टेलमधून मंत्रालयात गेला होता. असे भारतीय राजकारणात कदाचित पहिल्यांदाच घडले होते.
नाव घेण्यास विसरले
रामदास आठवले यांचा 5 जुलैला मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये जेव्हा आठवले शपथ घेण्यासाठी उभे राहिले तेव्हा स्वतःच्या नावाचा उल्लेख करण्याचा त्यांना विसर पडला आणि राष्ट्रीय मीडियातही ते चर्चेचा विषय झाले.

कुठून आले होते रामदास आठवले
रामदास आठवले यांना आज लोक 'साहेब' म्हणून संबोधत असले तरी 1971 मध्ये सांगलीतून मुंबईत आलेला तो तरुण दलित चळवळीत कित्येक वर्षे रामदास म्हणूनच ओळखला जात होता.
'दलित पँथर' या लढावू चळवळीतून अनेक नवे नेते उद्यास आले त्यापैकीच एक होते रामदास आठवले. नामदेव ढसाळ, राजा ढाले, अरुण कांबळे यांच्यासोबत रामदास आठवले हे मुंबईत पँथरचे काम करत होते.
तगडा जनसंपर्क
मुंबईत झोपडपट्टयांपासून महाराष्ट्रातील गावागावात रामदास पायाला भिंगरी लावून फिरत होता. या भ्रमंतीमधून त्यांची प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी जवळीक वाढली.
पँथरने मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न लावून धरला. या आंदोलनाने 1970 ते 75 दरम्यान नवशिक्षित दलित आणि पुरोगामी तरुण पेटून उठला होता.
महाराष्ट्रात कुठेही अन्याय-अत्याचार झाला की तिथे पँथर पोहोचलीच पाहिजे हे समीकरण होऊन बसले होते. राजा ढाले आणि नामदेव ढसाळांची पँथर फुटल्यानंतर रामदास आठवले यांनी या लढाऊ तरुणांचे नेतृत्व केले.
शपथविधीसाठी होस्टेलमधून मंत्रालयात
यातूनच त्यांना 1990 मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतले. तेव्हा रामदास आठवले हे वडाळ्यातील सिद्धार्थ होस्टलवरील 50 क्रमांकाच्या रुममध्ये राहात होते. सांगलीतून मुंबईत आल्यापासून मंत्री होईपर्यंत हा तरुण होस्टेलमध्ये राहात होता आणि होस्टेलमधूनच शपथविधीसाठी मंत्रालयात गेला. हा कफ्फलकपणाच त्याचे ग्लॅमर होते.
रामदास आठवले मंत्री होऊन ही नामांतर नाही
रामदास आठवले मंत्री होऊन चार वर्षे झाली तरी ज्या आंदोलनातून हे मंत्रीपद मिळाले होते, ते मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर काही दलित जनेतच्या दृष्टीक्षेपात दिसत नव्हते.
सरकारविरोधातील जनक्षोभ वाढत चालला होता. त्याच दरम्यान नांदेड जिल्ह्यातील भारतीय दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष गौतम वाघमारे या तरुणाने स्वतःच स्वतःची चिता रचून त्यावर आत्मदहन केले.
याचा परिणाम असा झाला की शरद पवारांना 14 जानेवारी 1994 रोजी नामांतराची घोषणा करावी लागली. रामदास आठवले मंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून रामदास आठवले कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीसोबत राहून सत्तेत राहिले. आठवले 1998 मध्ये उत्तर-मध्य मुंबईमधून तर 2004 मध्ये पंढरपूरमधून लोकसभेवर गेले. तेव्हापासून त्यांना मंत्रिपद हुलकावणी देत आले होते.
शिर्डीतील पराभव जिव्हारी लागला
2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत रिपाईने युती केली आणि रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. मात्र येथे त्यांचा दारुन पराभव झाला आणि तो त्यांच्या जिव्हारी लागला.
काँग्रेस - राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
2011 मध्ये आठवलेंनी काँग्रेस आणि शरद पवारांची साथ सोडली. रिपाई हा स्वतंत्र पक्ष असला तरी रामदास आठवले यांनी प्रत्येकवेळी कोणाच्या ना कोण्याच्या सोबत जाऊनच निवडणूक लढली आहे. काँग्रेस आणि पवारांना सोडल्यानंतर त्यांनी थेट आजपर्यंत प्रत्यक्ष शत्रू समजल्या जाणाऱ्या शिवसेनेसोबत हात मिळवणी केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जात त्यांनी शिवशक्ती - भीमशक्तीचा नवा प्रयोग महाराष्ट्रात केला. या प्रयोगातून त्यांच्या हाती मात्र काहीही लागले नाही.
...तरीही भाजपची साथ सोडली नाही
2014 मध्ये काळाची पावले ओळखत आठवलेंनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपकडे मोर्चा वळवला. या युतीतून त्यांना विधानसभेत काही भरीव मिळाले असे मुळीच नाही. मात्र त्यांनी लोकसभेतही भाजपला साथ दिली आणि महाराष्ट्रातून भाजपला जे यश मिळाले त्यात रिपाईचाही मोठा वाटा असल्याचे सांगत आपल्या मंत्रिपदाची खुर्ची तेव्हापासून पक्की केली होती.
दरम्यानच्या काळात आंबेडकरी जनतेतून त्यांच्यावर मोठी टीकाही झाली होती. थेट उजव्या विचारांच्या शक्तीविरोधात हातमिळवणी केल्याने एक मोठा आंबेडकरी समुदाय त्यांच्यावर नाराज होता. त्यातच हैदराबाद विद्यापीठातील स्कॉलर रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणाने हा रोष आणखी वाढला होता. त्याची झळ सोसून आठवले भाजपसोबत राहिले होते. त्याचे फळ अखेर त्यांना 5 जुलैला मिळाले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रामदास आठवले यांचे मोदींपासून नाना पाटेकर, संजय दत्तसोबतचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...