आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवले यांना हवे मंत्री, राज्यपाल, विधानसभेच्या 13 तर परिषदेच्या दोन जागा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महायुतीचा घटक असलेले खासदार रामदास आठवले यांनी आज दुपारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत 13 जागा देण्यात याव्यात अशी मागणी केली.

भाजप आणि शिवसेनेचाच गुंता सुटत नसल्याने महायुतीमध्ये असलेले छोटे छोटे पक्ष मात्र पुरते वैतागले आहेत. शिवसेना ऐनवेळी हातात वाटाण्याच्या अक्षता देत असल्याचा अनुभव गाठिशी असल्याने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज अमित शहा यांची भेट घेत त्यांच्याकडे मागण्यांची यादी सादर केली. आठवले यांच्या पक्षातील किमान एकास कोणत्याही राज्याचे राज्यपाल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. विधान परिदषेवर रिपाच्या दोघांना पाठविण्यात यावे आणि महायुतीचे सरकार आले की काही महामंडळे आमच्यासाठी असावीत अशी मागणी केली. याशिवाय दलित मतदारांच्या भावनांचा आदर करीत केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तारात मला मंत्री करण्यात यावे अशी मागणीही आठवले यांनी जोरकसपणे केली. अमित शहा यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता आठवले यांचे म्हणणे ऐकूण घेतले.