आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Questions AAP Claim That His Tenure Had Ended

लोकपाल पदावरून कधी काढले, रामदास यांचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अॅडमिरल रामदास यांनी स्वत:ला लोकपाल पदावरून कसे हटवण्यात आले , असा सवाल आम आदमी पार्टीला केला आहे. सरचिटणीस पंकज गुप्ता यांना इ-मेल करून मला लोकपाल पदावरून कधी काढले. माझा तर कार्यकाळ २०१६ मध्ये संपणार होता. पक्षाचा हा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक आणि निराश करणारा असल्याचे त्यांनी मेलमध्ये म्हटले आहे.
आम आदमी पार्टीतील वादंग अजुनही संपण्याची चिन्हे दिसत नाही. त्यातूनच त्यांनी केलेला इ-मेल लीक झाला. दुसरीकडे रामदास यांनी मेल पाठवण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु त्यामधील आशय स्पष्ट करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. हा विषय पक्ष आणि माझ्यातील आहे. मेलमध्ये रामदास म्हणतात, पक्षाची घटना तर लोकपालची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते, असे सांगते, याची आठवण करून दिली आहे. दरम्यान, निर्णयाच्या चार दिवसांपूर्वी रामदास, इलिना सेन यांना डच्चू देऊन एन. दिलीप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती केली हाेती.
इ-मेलमधील प्रश्नांची जंत्री

- माझा कार्यकाळ २०१३ मध्ये संपल्याचे म्हटले गेले आहे. तसे असेल तर दिल्ली निवडणुकीत मला लोकपाल म्हणून काम काम करायला लावण्यात आले ?
- माझ्याकडून पक्षाने लोकसभा निवडणुकी दरम्यान मार्च-एप्रिल २०१४ मध्ये उत्तर प्रदेश-हरियाणाच्या काही उमेदवारांची चौकशी करण्यास सांगितले होते. मग ती कारवाई कायद्याने होती का ?
- मला हटवण्याच्या चार दिवस अगोदर २५ मार्चपर्यंत माझ्याकडून तपासाचे काम का करून घेण्यात आले ?