आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rameshchandra Katoch Made Record Involving Parad For 27 Years

सलग 27 वर्षे परेडमध्‍ये सहभागी होणारे रमेशचंद्र कटोच ठरणार एकमेव अधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 26 जानेवारीला होणा-या परेडमध्ये भारतीय नौदलाचे अधिकारी रमेशचंद्र कटोच यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला जाईल. सलग 27 वर्षे परेडमध्ये सहभागी होणारे ते एकमेव भारतीय अधिकारी ठरतील. या काळात त्यांनी 16 वेळेस नौदलाच्या 81 सदस्यीय बँडपथकाचे नेतृत्व केलेले आहे.
30 देशांत राष्‍ट्रगीताची धून
हिमाचल प्रदेशाच्या कांगडातील बडुआं गावाचे रहिवासी रमेश कटोच यांनी 30 पेक्षा अधिक देशांत जाऊन राष्‍ट्रगीत, सारे जहां से अच्छा व भारतीय लष्कराच्या धून ऐकवल्या आहेत. चीफ पॅटी आॅफिसर असलेल्या रमेश यांनी अनेक देशांत भारतीय लष्कराच्या सैन्यदल, नौदल व हवाई दलाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या सुरावटी शिकणा-या व त्याची मुक्तकंठाने स्तुती करणा-या देशांत जपान, आॅस्ट्रेलिया, मलेशिया, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, इंग्लंड, थायलंड, जर्मनी, बांगलादेश आदींचा समावेश आहे. यामुळे नौदलात त्यांना प्रथम श्रेणीतील संगीतवादकाचा दर्जा आहे.
तरुणाईत भरला नवा जोश
52 वर्षांच्या रमेश यांनी देशभरात 150 पेक्षा अधिक सार्वजनिक ठिकाणांवर लष्कराची धून वाजवलेली आहे. त्यांच्या विक्रमाची माहिती कळाल्यानंतर अनेक वरिष्ठ अधिकारी व लष्करी कर्मचारी त्यांची भेट घेण्यासाठी सरावाच्या ठिकाणी आवर्जून भेट देतात. नौदलालाही या आपल्या सुरेल अधिका-याचा अभिमान आहे. लष्कराच्या तिन्ही दळांत रमेश यांच्यासारखा सन्मान आजवर कुणालाच मिळालेला नाही. असे कौडकौतुक दिल्लीत नौदलाचे कमांडर पी.व्ही.एस. सतीश यांनी करतात.
कुटुंबाने मात्र परेड बघितलेली नाही
खुद्द रमेश यांच्या कुटुंबाने त्यांची लाइव्ह परेड आजवर अनुभवलेली नाही. कटोच यांना आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. त्यांच्यासाठी कटोच यांनी 27 वर्षांत एकदाही परेड पास घेतलेला नाही.