रामेश्वरम- देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावर उद्या (गुरुवारी) रामेश्वरम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्या अनुषंगाने कलाम यांचे हजारो चाहते देशभरातून या ठिकाणी आले आहेत. दरम्यान, अब्दुल कलाम यांचे पार्थिव रामेश्वरममध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. हजारो लोक आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी येत आहेत. पार्थिव नेण्यात येत असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली असून यात शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
पंतप्रधान येणार; जयललिता नाही
कलामांच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राज्यातील काही मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र, तमीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या उपस्थित राहू शकणार नाहीत.
रामनाथपुरममध्ये सकाळपासूनच लावल्या रांगा
डॉ. कलाम यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी तमीळनाडूमध्ये गुरुवारी राज्य सरकारने शासकीय सुटी घोषित केली आहे. कलामांना श्रद्धांजली देण्यासाठी आज सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या. रामेश्वरपासून 50 किलो मीटर दूर असलेल्या रामनाथपूरमच्या श्वार्ट्ज स्कूलमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे.
सुपर्द-ए-खाक करण्यासाठी राज्य सरकार देणार जमीन
कलामांना सुपर्द-ए-खाक (अंत्यसंस्कार) करण्यासाठी तमीळनाडू सरकार जमीन देणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री जयललिता यांनी केली आहे. त्यांनी सांगितले, कलामांचे मोठे भाऊ APJM माराईकयार आणि त्यांच्या परिवाराने जमिनीची मागणी केली होती. त्यासाठी प्रशासनाने तीन जागा निश्चित केल्या असून, यापैकी एका ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. जे तीन स्थळे निवडली गेली त्यात मेयामपुली, नटराजपुरम आणि दानुषकोडी यांचा समावेश आहे.
स्वत:च्याच नावाला केला विरोध
रामनाथपुरमच्या स्वार्टज हायर सेकेंडरी स्कूलचे मुख्याध्यापक टी. पॉल म्हणाले, “कलाम यांना जेव्हा कधी वेळ मिळत होता तेव्हा ते या शाळेत येत. शाळेतील एका ब्लॉकला आम्ही त्यांचे नाव देण्याचे ठरवले तर त्यांनी विरोध केला होता’’, अशी माहितीही त्यांनी दिली.
बालपणीचा मित्र भावूक
कलाम यांचे वर्ग मित्र असलेले स्टीफन जेयासीलन हेही खूप भावूक झाले आहेत. वर्ष 2000 पासून त्यांनी भेट झाली नाही. आता त्यांना कलमांना अखेरचे पाहायचे आहे.
लहानपणापासून मोठे केस आणि पुस्तकांची आवड
स्टीफन यांनी सांगितले, ‘‘कलाम यांचे केस लहानपणपासूनच लांब होते. शिवाय त्यांना पुस्ताकांची आवडही होती. या दोन्ही गोष्टी त्यांनी शेवटपर्यंत जपल्या. जेव्हा शाळेतील इतर मुलं फुटबॉल खेळत असत तेव्हा कलाम पुस्तक वाचत होते. वादविवाद स्पर्धेत ते कायम पहिलेच यायचे. ब-याच वेळा कलाम यांच्याकडे शुल्क भरण्यासाठी पैसे नसायचे तर त्यांना शिक्षक मदत करत असत. पुढे 1970 च्या दशकात जेव्हा कलामांचे नाव वर्तमानपत्रात यायला लागले तेव्हा आम्हाला त्यांचे मोठेपण कळाले’’, असेही त्यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटो...