आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू प्रसाद यादवांचे रामकृपाल भाजपच्या चरणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लालू यादवांचे ‘हनुमान’ म्हटले जाणारे रामकृपाल यादव यांनी अखेर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. लालूंशी 35 वर्षे जुने नाते तोडून आलेल्या रामकृपाल यांनी भाजपमधील सर्व दिग्गज-राजनाथ सिंह, सुशीलकुमार मोदी, सीपी ठाकूर, रविशंकर प्रसाद यांना नमस्कार क रून पक्ष सदस्यत्वाची शपथ घेतली. ते पाटण्यातून लालूंची कन्या मिसा भारतीविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

रामकृपाल भस्मासुर आहेत
रातोरात मोदी रामकृपाल यांचे भाऊ झाले.राजनाथ यांच्या चरणी लीन झाले.सार्‍या तत्त्वांना हरताळ फासला. विचारांचे होळीत दहन केले.रामकृपाल भस्मासुर आहेत. एक दिवस भस्म होऊ न जातील.- लालू यादव

रामकृपाल लालूंचे नोकर
रामकृपाल यांनी आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश घेतला. राजदमध्ये त्यांना स्थान नव्हते. ते केवळ लालूंच्या घरचे नोकर होते. - नवलकिशोर यादव, बिहार भाजप नेते.

याला म्हणतात राजकारण ..
यासाठी मोदींना साथ देणार .
चहा विकणार्‍याचा मुलगा आज सर्वोच्च् स्थानावर जात आहे. म्हणून मी कामगाराचा मुलगा त्यांना साथ देत आहे.-रामकृपाल

भाजपाई रामकृपाल यांचा नमो सूर
मोदी विकासपुरुष, ते सर्वांना सोबत घेऊन चालतात.
मोदी विकासपुरुष आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली गुजरात झळाळून उठलाय. मोदी सर्वांनाच सोबत घेऊन चालतात. मोदी देशाचा विकास करू शकतात. (भाजपचे सदस्यत्व घेताना )

लालूसोबत होते.. त्या वेळी टोमणे
मोदींचा रथ अडवण्याची शक्ती केवळ लालूंमध्येच आहे.
मोदींनी मुस्लिमांचे शिरकाण केले.त्यांनी देशाच्या नावाला काळिमा फासला.असा माणूस पंतप्रधानपदी बसल्यास देशाचा विनाश अटळ आहे. (टीव्हीवरील एका चर्चेत मतप्रदर्शन )