आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramlila Sonia Gandhi Ravan Dahan Manmohan Singh Dushera Parv New Delhi

PHOTOS : सोनियांचा हा अवतार पाहून प्रियंका गांधीच्या चेहर्‍यावर उमलले हास्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - श्रीरामाने रावणाचा अनेकदा शिरच्छेद केला मात्र, तिथे पुन्हा नवे डोके येत होते. तेव्हा बिभीषणाने श्रीरामाला सांगितले की, रावणाच्या बेंबीत अमृत आहे, तिथेच बाण मार तेव्हा त्याचा अंत होईल. त्यानंतर श्रीरामाने रावणाच्या बेंबीवर नेम धरून बाण सोडला आणि रावणाचा अंत झाला. रविवारी देशभर रावण दहन करून श्रीरामाचा जयघोष झाला. दिल्लीतील लाल किल्ल्यावरील रावण दहन कार्यक्रमासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. सोनिया गांधींनी बाण मारुन रावण दहन केले.

रावण दहननंतर रामलिला आणि कवि संमेलन झाले. यावेळी कविंच्या कोपरखळ्यांनी श्रोत्यांची वाहव्वा मिळवली. रामलिलेचे प्रमुख आकर्षण रावण, मेघनाद आणि कुंभकरण यांचे भव्य पुतळे होते.