आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद शनिवारी मुंबईत; ‘माताेश्री’वर जाणार नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - राष्ट्रपतिपदासाठी भाजपप्रणीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद शनिवारी (१५ जुलै) मुंबईत येत आहेत. मात्र या दौऱ्यात ते ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार नाहीत. यापूर्वी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असताना प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांनी ‘मातोश्री’वर हजेरी लावली हाेती, त्यांना शिवसेनेेने पाठिंबाही दिला हाेता. मात्र अाता काेविंद यांना पाठिंबा देऊनही ते शिवसेना नेतृत्वाची भेट टाळणार असल्याची माहिती अाहे.   
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांचे नाव घोषित केल्यानंतर एनडीएतील सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. यात शिवसेनेचाही समावेश आहे. मात्र कोविंद राष्ट्रपतिपदाचा उमेदवारी अर्ज भरत असताना शिवसेनेचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी कोविंद “मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील असे वाटत होते. परंतु त्यांच्या दौऱ्यात ‘मातोश्री’भेटीचा उल्लेख नाही.
 
 काँग्रेसच्या काळात प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली हाेती. त्यावर शिवसेनेने पाठिंबाही दिला हाेता. इतकेच नव्हे तर मुखर्जी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती करावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली होती.  
 
अमित शहा गेल्याने काेविंद जाणे टाळणार  
रामनाथ कोविंद शनिवारी मुंबई विमानतळावरून थेट गरवारे क्लब येथे जाणार आहेत. तेथे ते भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि एनडीएमधील घटक पक्षांच्या सदस्यांशी चर्चा करतील. शिवसेनेचे प्रतिनिधीही या ठिकाणी काेविंद यांची भेट घेऊन चर्चा करणार अाहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कोविंद यांच्या उमेदवारीबाबत ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली हाेती. त्यामुळे अाता कोविंद ‘मातोश्री’वर जाणार नसल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. 
 
हेही वाचा... 
बातम्या आणखी आहेत...