आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे प्रवक्ते असूनही कधीच TV वर झळकले नाहीत कोविंद: 10 पॉइंट्समध्ये जाणून घ्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली - एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी मीरा कुमार यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. कोविंद यांचे राष्ट्रपती होणे पक्षीय बलाबलनुसार पूर्वनिश्चित असल्याची चर्चा होती. यापूर्वी जेव्हा त्यांना बिहारचे राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आले, त्यावेळी बिहारचे सीएम नितीश कुमार यांनाही त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. कोविंद भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राहिले आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रीय प्रवक्ते असतानाही ते कधीच टीव्हीवर झळकले नाहीत. त्यांना वादात अडकून राहणे मुळीच पसंत नाही. 
 
 
10 पॉइंट्समध्ये कोविंद यांच्याबाबत जाणू घ्या...

1 #जन्म
- 1 ऑक्टोबर 1945 रोजी कानपूरच्या डेरापूर येथील पराँख गावात त्यांचा जन्म झाला. सविता कोविंद विवाहित असून त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
 
2 # सुप्रीम कोर्ट-हाईकोर्ट
- 1978 मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात वकीली केली. 1980 ते 1993 पर्यंत ते सुप्रीम कोर्टात केंद्राच्या स्थायी समितीमध्ये सुद्धा होते. 1971 मध्ये दिल्ली बार काउंसिलमध्ये ते अॅडव्होकेट राहिले आहेत. 1977 ते 1979 दरम्यान दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकारचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
 
बातम्या आणखी आहेत...