आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गव्हावर 25% आयात शुल्क कायम : रामविलास पासवान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गव्हावर लावण्यात आलेले २५ टक्के आयात शुल्क कायम राहणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील गव्हाचे उत्पादन टक्के जास्त राहणार असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी दिली. यासंदर्भात लवकरच नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या अंदाजानुसार पीक हंगाम २०१५-१६ (जुलै ते जून) दरम्यान गहू उत्पादन ९४०.५ लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ८६५.३ लाख टन गहू उत्पादन झाले होते. याआधी गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत असलेल्या किमती पाहता यावरील आयात शुल्क काढण्याचा विचार सरकारच्या वतीने करण्यात आला होता.

अन्न पुरवठा मंत्रालय तसेच अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक झाली होती. मात्र, आता टक्के उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे आयात शुल्क कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च महिन्यात किमतीमध्ये असलेली तेजी पाहता गव्हावरील आयात शुल्क तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला होता.

२३० लाख टन गहू खरेदी
केंद्र सरकारने आतापर्यंत २३० लाख टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सरकारने २८० लाख टन गहू खरेदी केला होता. एक एप्रिलपर्यंत एफसीआयजवळ ३०० लाख टन गहू होता. गेल्या वर्षी खासगी व्यावसायिकांच्या माध्यमातून लाख टन गव्हाची आयात करण्यात आली होती. भारतात उत्पादीत गव्हात जास्त प्रोटीनयुक्त गव्हाचा पुरवठा कमी झाल्यामुळे गहू आयात करावा लागत आहे.