आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramvilas Paswan Speaks About Modi Government 5 Years Plan In Lok Sabha

मोदींमुळे 336 जागा मिळाल्या, मग त्यांचे नाव का नाही घ्यायचे? पासवान यांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान मंगळवारी लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांनी भाजप सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या कामांबाबत स्पष्टपणे आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींचे तोंडभरुन कौतुकही केले. विरोधकांनी जेव्हा गोंधळ सुरू केला त्यावेळी मात्र पासवान त्यांच्यावरच बरसले. ते म्हणाले, तुम्हाला सोनिया गांधी किंवा इतर कोणाच्या नावावर मते मिळाली नाही. मात्र आम्हाला मोदींच्या नावावर मते मिळाली आहेत. मग पुन्हा पुन्हा त्यांचे नाव का घ्यायचे नाही.
लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे बियास नदीत वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दुसरीकडे राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान गोंधळ झाल्याने कामकाज स्थगित करावे लागले.

गुजरात दंगली विसरण्याची विनंती
आपण गोध्रा हत्याकांड विसरून पुढे जाण्याची गरज असल्याचे मत पासवान यांनी भाषणादरम्यान व्यक्त केले. ते म्हणाले, देशात आणीबाणी लागली, शीखविरोधी दंगली झाल्या पण लोक सर्वकाही विसरले. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये दंगली झाल्या पण लोक तेही विसरले. मग गोधरा हत्याकांड किती दिवस लावून धरणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजपला धार्मिक म्हणा-यांवर हल्ला
पासवान यांनी धार्मिकतेच्या मुद्यावरही परखडपणे मत मांडले. भाजपवर धार्मिक मुद्यावर राजकारण करण्याचा किंवा धार्मिक पक्ष असल्याचा आरोप लावणा-यांवर त्यांनी हल्लाबोल केला. आम्हाला धर्मांध असल्याचे बोलले जात होते. पण लोकांनी आम्हाला 336 जागा दिल्या. म्हणजे मग भारताची जनताही धर्मांध आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.