आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramvilas Paswan Takes Swipe At Lalu Over Law And Order Comments

लालूंनी कायद्यावर बोलणे हास्यास्पद; रामविलास पासवानांनी उडवली खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीतील मतभेदांची देशभर चर्चा असतानाच लालूप्रसाद यादव यांचे एकेकाळचे सहकारी व लोजपचे प्रमुख रामविलास पासवान यांनी त्यांची खिल्ली उडवली. कायदा आणि सुव्यवस्थेवरून त्यांनी शिकवावे, हे निव्वळ हास्यास्पद असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे.

राजद आणि जदयू यांच्यातील महाआघाडी कोणत्याही परिस्थितीत कार्यकाळ पूर्ण करेल असे वाटत नाही. त्यामुळेच राज्यातील सरकार टिकणार नाही, असे भाकीत करून ते म्हणाले, लालूंनी नितीशकुमारांना कायदा आणि सुव्यवस्था शिकवावी यापेक्षा हास्यास्पद ते काय असू शकेल? अर्थात, कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर आता राजद ठरवणार हे स्पष्ट झाले आहे. खरे तर राज्याच्या सध्याच्या स्थितीला केवळ लालूच जबाबदार आहेत. त्यांनी १५ वर्षे पेरलेले उगवल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचीच ही फळे आहेत. ते वृत्तसंस्थेशी बोलत होते.

नितीश के सर पे ताज है, लालू का राज है... : लालूंना सत्ता हवी आहे म्हणूनच ते नितीशकुमार यांच्या शिरावर मुकुट ठेवून स्वत:ची सत्ता चालवतील, असे मी पूर्वीच म्हटले होते. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. ‘नितीश के सर पे ताज है, लालू का राज है,’ असे मी म्हटले होते. त्याच मार्गाने सगळ्या गोष्टी होत आहेत. दरम्यान एकेकाळचे सहकारी म्हणून पासवान-लालू यांची आेळख आहे. अनेक वर्षे दोन्ही नेते सोबत राहिले. परंतु बदलत्या परिस्थितीत उभय नेत्यांमध्ये राजकीय मतभेद वाढले आहेत. त्यामुळेच पासवान यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही.

नेमका वाद काय ?
बिहारमध्ये तीन अभियंत्यांची हत्या झाली होती. त्यावरून सत्ताधारी घटक पक्ष राजदचे रघुवंश प्रसाद सिंह यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. नितीशकुमार गाडीच्या पहिल्या आसनावर आहेत. त्यामुळे बिघडलेल्या स्थितीला ते जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यावरून जदयूने लहान मुलगादेखील सल्ला देऊ शकतो, राज्यातील ११ कोटी जनतेने नितीश कुमार यांची निवड केली आहे, असे उत्तर दिले होते. त्यानंतर लालूंनी हस्तक्षेप करत नेत्यांचे कान पिळले होते.