आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ranatunga Ask Lankan Players To Boycott IPL Season 6

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीलंकेच्या खेळाडूंनी ‘आयपीएल-6’वर बहिष्कार टाकावा - अर्जुन रणतुंगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने आयपीएलच्या प्रशासकीय परिषदेविरोधात मोर्चा उघडला आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंना ‘आयपीएल-6’वर बहिष्कार टाकण्याचे अवाहन त्याने केले आहे. तामिळींच्या मानवाधिकाराच्या मुद्यावरून राजकारण तापत असताना आयपीएलमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंना विरोध होत होता. त्यानंतर ‘आयपीएल-6’च्या चेन्नईत होणा-या सामन्यांत श्रीलंकेचा एकही खेळाडू खेळणार नाही, असा निर्णय आयपीएलच्या प्रशासकीय परिषदेने घेतल्याची माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली होती.

रणतुंगा म्हणाला, श्रीलंकेच्या खेळाडूंना चेन्नईमध्ये विरोध होत असेल तर, त्यांनी भारतातील इतर भागात खेळण्यास हरकत नाही. मात्र, तिथेही त्यांना विरोध होत असेल तर, मला वाटते त्यांनी आयपीएल-6 वर बहिष्कार टाकला पाहिजे. दक्षिण भारतातील नेत्यांनी युद्ध अपराध्यांचा हवाला दिला आहे. मला असे वाटते की, श्रीलंकेच्या खेळाडूंनी देशाचा विचार करून आयपीएल-6 मधूनच बाहेर पडले पाहिजे.

चेन्नईत होणा-या सामन्यांत श्रीलंकेच्या खेळाडूंना खेळू देण्यास नकार देणा-या आयपीएल प्रशासकीय परिषदेच्या निर्णयाला राजकारणाचा वास येत असल्याचे सांगत रणतुंगा म्हणाला, चेन्नईत जर विरोध होत असेल तर, तेथील आयपीएलचे सामनेच रद्द करून दुसरीकडे खेळवले जायला हवे होते.

तो म्हणाला, आयपीएल प्रशासकीय परिषदेला खेळाडूंची एवढीच काळजी होती तर, त्यांनी तेथील सामने दुसरीकडे खेळवण्यास काहीच हरकत नव्हती. मात्र, या सर्व प्रकरणाला राजकीय वास येत आहे.