आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील साठेबाजांवर लवकरच कारवाई होणार; रावसाहेब दानवेंचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॉँग्रेसने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा विधेयकाला 4 जुलै रोजी वर्ष पूर्ण होत असून याच दिवशी देशातील सर्वच राज्यांतील अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या विधेयकाची समीक्षा करून केंद्र सरकार राज्यांचे मत विचारात घेणार आहे. महाराष्ट्रात अन्नधान्याची साठेबाजी करणारे केंद्र सरकारच्या रडारवर असून त्यांच्यावर धाडी घालण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

अन्न-पीक-पावसाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी विज्ञान भवनात बैठक होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे या परिषदेला उपस्थित राहाणार आहेत. ‘दिव्य मराठी’शी बोलताना दानवे म्हणाले, ज्या राज्यांत गेल्या वर्षभरात योजनेचे काय परिणाम झालेत त्याचा आढावा ही राज्ये सादर करतील. तर ज्या राज्यांनी अद्याप ही योजना सुरू केलेली नाही त्याबाबत त्यांचीही मते जाणून घेतली जातील. गेल्या वर्षभरात या योजनेत राज्य सरकारांना 131.66 कोटी रुपयांची सवलत देण्यात आली आहे. वर्षाला या अनुषंगाने 624.3 लाख टन अन्न लागणार आहे.

दुष्काळाबाबत राज्य सरकार बधिर : दानवे
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने अद्याप एकही बैठक घेतली नाही, तर पालकमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्याचा आढावाही घेतलेला नाही. राज्यातील धरणांमध्ये थेंबभरही पाणी नाही. जायकवाडीत 4 टक्के पाणी आहे. राज्यात जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी आणि मजुरांना काम या तिन्ही गोष्टी युद्धपातळीवर कराव्या लागणार आहेत, परंतु राज्य सरकार बधिर झाले असून केंद्र सरकारने दिलेला निधी खर्च करण्याची क्षमता राज्याची नसल्याने दिलेला निधी पडून असतो. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्यात साखर, कांदा, अन्नधान्य मुबलक प्रमाणात आहे. मात्र, जे साठेबाजी करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.

(फोटो - रावसाहेब दानवे)