आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातिवंत गुन्हेगार घाबरणार कसे, दानवेंचा सुप्रिया सुळे यांना टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘जातिवंत गुन्हेगाराने गुन्हा केला असेल तर तो तुरुंगात जायला घाबरत नाही असेच सुप्रिया सुळे यांना म्हणायचे असेल,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी लगावला. भुजबळ यांच्या अटकेनंतर ‘सर्वांना तुरुंगात डांबा, आम्ही मराठे आहोत; घाबरत नाही,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती.

भुजबळांवरील कारवाईबाबत दानवे म्हणाले, ‘गुन्हेगाराला जात नसते. नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, त्यांनी कोणते ‘विक्रम’ करून ठेवले ते देशाला माहिती आहे. आघाडीने जर राज्यकारभार चांगला केला असता, तर दुष्काळाचे संकट टाळता आले असते.

भावना भडकवू नका : शेट्टी
‘भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो. त्याला जातीय समीकरणात गुंतवून लरेकांच्या भावना भडकवू नका,’ अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली. सिंचनाचे प्रकल्प कुणामुळे अर्धवट राहिले, साखर कारखाने कुणी माेडून काढले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.