आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape Accused Driver Of Uber Cab Was Serial Sex Offender

कॅबमध्ये बलात्कार: रस्त्याने मुलींची ओढणी ओढायचा ड्रायव्हर, उत्तरप्रदेशातून होता हद्दपार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उबर कॅबमध्ये 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी ड्रायव्हर शिवकुमार यादव याच्यावर बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, छेडछाड यासारखे अनेक आरोप आहेत. आरोपी शिवकुमार उत्तरप्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील त्याचे मुळगाव रामपूरला जेव्हा जात होता, तेव्हा लोक त्यांच्या मुलींना घरात बंद करुन ठेवत होते. तो रस्त्याने चालत असताना कोणत्याही मुलीची ओढणी ओढ, अभद्र टिप्पणी कर आणि संधी मिळाली तर काहीही करु शकत होता. त्याच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे मैनपुरी जिल्हा पोलिसांनी काही वर्षांपूर्वी त्याला जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
त्याच्या या कारनाम्यांना कुटुंबीय देखील वैतागले होते. आरोपी शिवकुमारला त्याचे वडील रामनाथ यादव यांनी देखील घराबाहेर काढले होते. मात्र, त्याने त्यांचे ऐकले नाही. त्याचे वडील मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. 76 वर्षीय रामनाथ यांना गावातील सर्व लोक प्रतिष्ठीत नागरिक म्हणून ओळखतात. शिवकुमारच्या अशा वागणुकीमुळे त्याची 70 वर्षीय आई - गंगाश्री देखील त्रस्त आहे. त्या म्हणाल्या, हा दिवस पाहाण्याआधी मरण आले असते तर चांगले झाले असते.
मैनपुरी पोलिसांच्या माहितीनुसार, 2003 मध्ये शिवकुमारवर 354/523 ( महिलेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे किंवा ताकदीचा वापर करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षी त्याच्यावर 376/354 (गुन्हेगारी कृत्य/ आर्म्स अॅक्ट) नुसार गुन्हा दाखल केला होता. त्याला हद्दपार केल्यानतंर गेल्या वर्षभरापासून तो रामपूरमध्ये आलेला नाही. तो दिल्लीतच पत्नी आणि मुलांसह राहात होता. त्याने मोठ्या भावाच्या विधवेसोबत लग्न केले आहे.

फोटो - शुक्रवारी दिल्लीत उबेर कॅबमध्ये तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी शिवकुमार

पुढील स्लाइडमध्ये वाचा, पीडित तरुणीला ड्रायव्हरच्या थोबाडीत मारण्याची इच्छा, फाशीची केली मागणी