फोटो : पोलिस ठाण्यात बसलेली पीडिता
मुजफ्फरनगर - मुजफ्फरनगरमध्ये बलात्काराचा बदला घेण्यासाठी बलात्कार केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. आरोपीने त्याच्या बहिणीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी तोच मार्ग अवलंबला. त्याने बलात्कार करणा-याच्या बहिणीचे अपहरण करून तिला जंगलात पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिला तशाच अवस्थेत सोडून सर्वांनी पळ काढला. पोलिसांनी सामुहिक बलात्काराची तक्रार करून कारवाई सुरू केली आहे.
मुजफ्फरनगरच्या ककरोली येथील हे प्रकरण आहे. 26 ऑगस्ट रोजी अल्पसंख्याक समुदायातील एक तरुणी घारतून बेपत्ता झाली होती. या प्रकरणी 26 ऑगस्टला आभा (बदललेले नाव) तिचे भाऊ अर्जुन आणि सोनू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा हा गुन्हा होता. आयपीएसच्या 363, 366, 376, 329, 307 या प्रकरणांत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. नंतर पोलिसांना घरातून बेपत्ता झालेली मुलदी मिळाल्यानंतर पोलिसांनी आभाला चौकशी करून सोडून दिले.
तिच्या भावांना मात्र अटक करण्यात पोलिस अपयशी ठरले. पीडिता आभाच्या मते या बेपत्ता झालेल्या मुलीच्या भावाने आणि काकानेच तिचे अपहरण केले होते. त्यानंतचर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर कशीबशी शुद्धीत आल्यानंतर आभा रस्त्यावर पोहोचली व तिने कुटुंबीयांना आणि पोलिसांना कळवले.
पुढे पाहा घटनेशी संबंधित काही फोटो....