नवी दिल्ली- देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात दोन विदेशी महिलांवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सरोजनी नगरात शुक्रवारी सायकांळी ही घटना घडली. दोन्ही पीडित महिला तंजानियामधील (संयुक्त गणराज्य) आहेत. या घटनेवरून दिल्लीत महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोजनी नगरात दोन विदेशी महिलांवर शुक्रवारी (27जून) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन तरुणांनी बलात्कार केला. पीडित महिलांनी पोलिसांना फोन करून आपबिती सांगितली. महिलांनी दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे. कुणाल (रा. शास्त्री नगर) आणि सतीश ( रा.आर.के. पुरम) या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
दोन्ही पीडित महिलांनी दोन्ही आरोपींना ओळखले आहे. आरोपींसोबत पीडित महिलांचा वाद झाला होता. त्यावरून आरोपींनी हे कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.( (फाइल फोटो)