आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape Law No Tool To Force Someone To Marry Delhi Court

कोर्टाने फटकारले- बलात्कार कायदा लग्नासाठी बळजबरी करण्यासाठी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बलात्काराचा गुन्हा दाखल करुन कोणत्याही पुरुषावर लग्नासाठी बळजबरी करता येणार नसल्याचा निकाल येथील एका ट्रायल कोर्टाने दिला आहे. एका पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या विधवा महिलेने आरोप केला होता, की बराचकाळ सोबत राहून बलात्कार केल्यानंतर आता त्याने लग्नाला नकार दिला आहे. कोर्टाने महिलेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन ओरोपीला दोषमुक्त ठरविले आहे.
काय आहे प्रकरण
दिल्लीत राहाणाऱ्या एका विधवा महिलेने एका व्यक्तीवर सतत शारीरिक संबंध ठेवल्याचा, मात्र लग्नाला नकार दिल्याचा आरोप केला होता. 2012 पासून दोघांमध्ये संबंध होते, त्यानंतर एका वर्षाने महिलेने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या पुरुषाविरोधात बलात्कार करुन लग्नास नकार दिल्याची तक्रार दाखल केली होती. महिलेला दोन मुलं असल्याचे तिने कोर्टाला सांगितले आहे.
काय म्हणाल्या न्यायाधिश
ट्रायल कोर्टाच्या न्यायाधिश सरिता बिरबल यांच्या कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायाधिश म्हणाल्या, 'महिला आणि आरोपी एक वर्षांपेक्षा जास्त लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. आरोपीने लग्नाचे आश्वासन दिले किंवा जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही. दोघांमधील शारीरिक संबंध देखील दोघांच्या संमतीने होते. जर आरोपीने लग्नाचे आश्वासनच दिले नाही तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो. बलात्कार कायद्याचा अर्थ असा नाही की त्याचा वापर कोणावर लग्नासाठी बळजबरी करण्यासाठी करता येईल. कोर्ट आरोपीला बलात्काराच्या आरोपातून दोषमुक्त करत आहे.'
आरोपी म्हणाला - लग्नाचे आश्वासन दिले नव्हते
महिलेवर बळजबरी केलेली नाही, किंवा लग्नाचे आश्वासनही दिलेले नसल्याचे आरोपीने कोर्टात सांगितले. सुनावणी दरम्यान कोर्टाने म्हटले, की महिला आरोपीवर प्रेम करत होती त्यामुळे शारीरिक संबंध ठेवले.