आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगरेप पीडित महिला वकीलाने सरन्यायाधीशांच्या कक्षा बाहेर केले विष प्राशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या एका महिलेने न्याय मिळण्यास लागत असलेल्या विलंबाला वैतागून सरन्यायाधिशांच्या कक्षा बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर न्यायाला होणार्‍या विलंबाची चर्चा जोर धरु लागली आहे.
अत्याचार पीडित महिला छत्तीसगड राज्यातील आहे. तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तत्काळ तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाने स्वतः या प्रकरणाची सुनवाणी 23 सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे.
आत्महत्येचा प्रयत्न केलेली पीडित महिला वकील आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पतीच्या नातेवाईकांनी गँगरेप केल्याचा तिचा आरोप आहे. आज (सोमवार) सरन्यायाधीश आर.एम.लोढा यांच्या अध्यक्षेतखालील पीठ कामकाज आटोपून जाण्याची तयारी करत असताना महिला रडू लागली आणि न्याय मिळत नसल्याची तक्रार करु लागली. न्यायधीश मंडळींनी एका वकिला मार्फत महिला काय म्हणत आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आले, की महिलेने विषारी पदार्थ सेवन केला आहे. त्यानतंर महिलेला तातडीने राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.