नवी दिल्ली - राजधानीला लागून असलेल्या गुडगांवमध्ये सौदी अरबच्या डिप्लोमॅटच्या घरातून सोडवण्यात आलेल्या दोन 'सेक्स स्लेव्ह' नेपाळी महिलांचा वैद्यकीय अहवाल आला आहे. दोन वेगवेगळ्या अहवालांमधून या महिलांचा अमानुष छळ करण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला आहे. महिलांचा एवढ्या वाईट पद्धतीने लैंगिक छळ करण्यात आला की त्यातून सावरण्यासाठी त्यांना वर्षे लागण्याची शक्यता आहे.
दिल्ली पोलिसांना या दोन महिलांसोबत होणाऱ्या अत्याचाराची माहिती एका एनजीओने (मैती नेपाळ) दिली होती. त्यानंतर सोमवारी रात्री सौदी डिप्लोमॅट्सच्या घरातून त्यांना सोडवण्यात आले. सौदी डिप्लोमॅटवर आरोप आहे की त्यांनी महिलांना महिनाभर मारझोड केली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. गुडगावमध्ये ज्या फ्लॅटमध्ये नेपाळी महिलांना डांबून ठेवण्यात आले होते, त्या भागात सौदी अरब दुतावासाने 30 फ्लॅट्स भाड्याने घेतलेले आहेत.
काय म्हणतो मेडिकल रिपोर्ट ?
गुडगांव सिव्हिल हॉस्पिटलच्या एका वरिष्ठ मेडिकल ऑफिसरने एका इंग्रजी दैनिकाला सांगितले, या महिलांना प्रत्येक प्रकारच्या लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला होता. 20 वर्षांच्या तरुणीच्या डाव्या मनगटावर चाकूचे वार देखील होते. तर 44 वर्षांच्या महिलेच्याडोक्यावर मारहाणीच्या खूना होत्या. पहिल्या महिलेच्या गुप्तांगावर जखमांचे अधिक व्रण होते. दोन्ही महिलांची तपासणी प्रथम स्त्रीरोग तज्ज्ञ आणि नंतर एका वैद्यकीय समितीकडून करण्यात आली. मुख्य वैद्यकीय अधिकारी कांता गोयल म्हणाल्या दोन्ही अहवालांमध्ये एकाच प्रकारचे निष्कर्ष निघाले आहेत. या महिलांचे कपडे आणि नखांचे नमुने फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवण्यात आले आहेत. मेडिकल रिपोर्ट पोलिसांना सोपवण्यात आली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो