नवी दिल्ली - केंद्र सरकारने रेल्वे भाड्यात 14 टक्क्यांनी वाढ केली असून, प्रवाशांना चांगल्या सुविधा प्रदान करण्याचे आश्वासन दिले आहे. या सुविधांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचाही समावेश येतोच. मात्र याआधीची आकडेवारी पाहता गेल्या पाच वर्षांमध्ये रेल्वे प्रवास करणा-या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर आलेला दिसतो. तसेच त्यांना दिवसेंदिवस अधिक गैरसोयीला सामोरे जावे लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याच 5 वर्षांमध्ये प्रवाशी भाड्यामध्ये साल 40 टक्क्यांपैक्षाही अधिक वाढ झालेली आहे. 2009 मध्ये दिल्लीहून मुंबईला जाणा-या राजधानी एक्सप्रेसच्या फर्स्ट एसीसाठी 3300 रुपये तिकिट लागायचे. पण नुकत्याच झालेल्या भाडेवाढीनंतर याच तिकिटासाठी तब्बल 4722 रुपये मोजावे लागणार आहेत. ही भाडेवाढ 40 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.
प्रवाशांच्या सामानाची चोरी आणि लुटीच्या घटनाही वर्षात 19 हजाराच्या जवळपास पोहोचल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये 2013 च्या अखेरीपर्यंत अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधअये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याशिवाय 2004 पासून आतातपर्यंत महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये (बलात्कार वगळता) 305 टक्के वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता अशा अपराधांमध्ये झालेली वाढ 180 टक्क्यांच्या जवळपास आहे. आकडेवारी पाहता गेल्या एका वर्षात रेल्वे विभागांतर्गत झालेल्या 26 हजार गुन्ह्यांपैकी 60 टक्के रेल्वेमध्ये झालेले आहेत.
पुढे वाचा - नवे रेल्वेमंत्री जपत आहेत जुन्याच मंत्र्यांचा वारसा