आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाहोरमधून आलेल्या फोनवर नेहरूंना कोसळले रडु, पाहत राहिल्या होत्या इंदिरा गांधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्वातंत्र्याचे आंदोलन, भारत-पाकिस्तानचे विभाजन, लॉर्ड माउंटबॅटन यांच्याशी निगडित अनेक बाबी समोर आल्या आहेत. स्वातंत्र्याच्या 71 व्या वर्षात दिव्य मराठी काही काही बाबी आपल्यासमोर आणणार आहेत. या बाबी नरेंद्र सिंह सरिला आणि एलन कॅम्पबेल जॉन्सन यांनी आपल्या पुस्तकात लिहिल्या आहेत.
 
माउंटबॅटन यांच्या ADC होत्या सरीला
सरीला माऊंटबॅटन याच्या ADC आणि एलन प्रेस अटैची होत्या. माऊंटबॅटन यांच्या जवळच्या असल्याने काही अशा गोष्टीही त्यांनी लिहिल्या ज्या अतिशय कमी लोकांना माहित आहेत. याव्यतिरिक्त काही माहिती आम्ही ब्लॉग आणि अक्राईव्हच्या माध्यमातून आम्ही मिळवल्या आहेत.
 
अचानक खुर्ची वरुन खाली पडले नेहरु 
14 ऑगस्टला संध्याकाळची वेळ होती. नेहरु रात्रीच्या वेळी जेवण करत होते. त्यांची मुलगी इंदिरा आणि पद्मजा नायडू उपस्थित होत्या. अचानक फोन वाजला तो फोन नेहरुंनी उचलला. कोणीतरी लाहोरहून बोलत होते. जून्या लाहोर शहरातील हिंदू आणि शीखाच्या घरातील पाणीपुरवठा रोखण्यात आला होता. उष्णतेने नागरिकांचे हाल सुरु होते. कोणी पाणी मागितले तर त्यांना मारुन टाकण्यात येत होते. शहराच्या जवळपास अर्ध्या भागास आग लावण्यात आली होती. हे ऐकून नेहरु ओरडले आणि खाली पडले. त्यांचा चेहरा पिवळा पडला होता आणि दोन्ही हातांनी त्यांनी चेहरा झाकला होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. आवाजही निघत नव्हता. नंतर थोड्या वेळाने ते म्हणाले मी रात्री कसा भाषण करु शकेल? लाहोर जळत असताना मी आनंद कसा साजरा करु. 
 
सोर्स-
- नरेंद्र सिंह सरीला यांचे पुस्तक 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज़ पार्टिशन'.
- एलन कैम्पबेल जॉनसन यांचे पुस्तक 'भारत विभाजन' 
-  फ्रीडम एट मिडनाइट-लैरी कॉलिन्स आणि डोमनिक लेपियर
 
पुढील स्लाइडवर, 14 नव्हे, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झाला पाकिस्तान...
बातम्या आणखी आहेत...