(फोटो ओळ- वडील जैनुलाबिद्दीन मराकायार अब्दुल कलाम आणि त्यांच्या भावाला दररोज सायंकाळी या मशिदीत नमाज पठण करण्यासाठी नेत.)
माजी राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईलमॅन एपीजे अब्दुल कलाम यांचे काल निधन झाले. त्यांच्या मृत्यूने देशावर शोककळा पसरली आहे. तरुणाईत विशेष करुन विद्यार्थ्यांमध्ये कलाम फार लोकप्रिय होते. शिक्षक म्हणवून घेण्यास त्यांना आवडे. एखाद्या शाळेत, महाविद्यालयात किंवा विद्यापिठात गेले, की कलाम प्रथम विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत. त्यांच्याशी आयुष्यातील अनुभव शेअर करीत.
तमीळनाडूमधील रामेश्वरम येथे त्यांचे बालपण गेले. त्यांनी विंग्ज ऑफ फायर या पुस्तकात लहानपणीच्या अनेक आठवणी दिल्या आहेत. विशेष करुन येथील रामेश्वरम मंदिर आणि मशिदाचा उल्लेख आढळतो.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, अब्दुल कलाम यांचे काही RARE PHOTOS....